किराणा किटचे वाटप करताना अशोकशेठ सस्ते व सलिमभाई खान व इतर
फलटण :
सध्या कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळत असून त्यातच अनेक ठिकाणी लॉकडाऊन केल्यामूळे अनेक ठिकानी हातावरती पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहेत . त्यात फलटण मधील काही गावे व फलटण शहर हे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी घोषित केलेले आहे त्यामूळे हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते त्यामुळे हे ओळखून प्रसिद्ध उद्योजक अशोकशेठ सस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश साचव सलिमभाई खान यांनी फलटण शहरामधील हडको , आनंदनगर व परिसरातील गरजू नागरिकांना किराणा किट व भाजीपाल किटचे वाटप केले त्यांच्या या मदतीमुळे हडको व आनंद नगर परिसरातील लोकांनी दोघांचे आभार मानले . यावेली प्रसिद्ध व्यापारी संजय कदम , खराडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते .