मोता गारमेंट च्या वतीने कोविड सेंटर साठी मदत

मोता गारमेट्स च्या वतीने साहित्य दिल्याचे पत्र देताना नरेंद्र मोता व इतर
बारामती:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊन मध्ये बारामती येथील कापड व्यवसाईक व मोता गारमेंट चे संचालक नरेंद्र मोता,प्रियंक मोता यांनी कोविड सेंटर साठी मोता गारमेंट मध्ये तयार केलेले पी पी ई किट व मास्क गुरुवार दिनांक 06 मे रोजी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व नगरपरिषद चे मुध्यधिकारी किरणराज यादव यांच्या कडे सुपूर्द केले.
सामाजिक बांधीलकी व सामाजिक भान  जपत कोरोनाच्या महामारीत  सदर किट्स कोविड सेन्टर व कोरोना योध्याना वापरता यावे या साठी दिले जात असल्याची माहिती नरेंद्र मोता यांनी या वेळी दिली.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!