चौकट:
अनेक छोट्या मोठ्या कंपन्या कोविड सेंटर साठी विविध मार्गाने मदत करीत आहे त्यापेक्षा बारामती एमआयडीसी परिसरात भारत फोर्ज कंपनी किंवा ओरटेन कंपनी शेजारील मोकळ्या जागेत भव्य कोविड सेंटर उभे करावे व त्याठिकाणी विविध कंपन्यांनी मदत केल्यास कामगार व कुटूंबियाची बारामती शहराकडे व विविध रुग्णालयाकडे कोरोना उपचारासाठी जाण्याचा ओघ कमी होईल अशी मागणी करून प्रशासनास जागा सुद्धा पांडुरंग कचरे यांनी दाखवली आहे
एम आई डी सी मध्ये स्वबळावर कंपन्यांनी कोविड सेंटर सुरू करावे :भाजपा ची मागणी
जळोची फलटण टुडे वृत्तसेवा :
बारामती एम आई डी. सी मध्ये दररोज 15 ते 20 हजार कामगार काम करीत आहेत काही कंपन्या अत्यावश्यक सेवे मध्ये येत असल्याने व एक्स्पोर्ट नियमा मध्ये असलेने त्यांचे काम बंद करणे श्यक्य नाही .
तथापि कंपनी मध्ये कामगारांना एकाच ठिकाणी काम करावे लागत असलेने त्यांना व त्यांचे कुटुंबियाना कोरोना रोगाचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेचे स्पष्ट झाले असल्याने बारामती एमआयडीसी परिसरात कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी भाजपा चे तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी प्रांताधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
बारामती एम आई डी सी मधील विवध कंपनी मधील फक्त 10% कामगारांना विविध आरोग्य योजनेची सवलत मिळत असली तरी 90% कामगार हे कंत्राटी स्वरुपाचे असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही मोठ्या कंपनी मध्ये किमान 50 च्या वर कोरोना बाधित असलेने दिसून आले आहे.
कामगार बाधित झालेवर त्यांना स्वतः हालचाली करून बेड, ऑक्सिजन बेड, प्रसंगी लागल्यास व्हेंटिलेटर मिळत नाही त्या मुळे अनेक कामगारांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे त्यांचे कुटूंब प्रचंड तणावात व भीती मध्ये राहत आहे.
आशा घटना मध्ये कंपनीने आपल्या परिवारातील कामगारांसाठी कंपनी साठी जीव धोक्यात घालून काम करीत असताना कंपनी प्रशासनाची स्वतः ची ऐपत असताना आता पर्यंत स्वतः हुन आपल्या कामगारां करिता स्वतःचे अद्यावत असे कोविड सेंटर/तपासणी केंद्र ,लसीकरण निर्माण करावेत
असे केल्याने शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होऊन कामगारांना सुध्दा खूप मदत होईल त्यामुळे त्वरित कंपनी व्यवस्थापन याना या बाबत आदेश करावेत अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे .