पेन्सील चौक येथे चहापान उपक्रमाचा शुभारंभ करताना नारायण शिरगावकर,धनंजय जामदार व इतर उदोजक (छाया अनिल सावळेपाटील)
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती एमआयडीसी मधील उद्योजकाची बारामती इंद्रसटीज मनुफॅक्टरिंग असोसिएशन (बिमा) यांच्या वतीने लॉकडाऊन मधील कालावधीत बारामती शहरामध्ये बंदोवस्त करणाऱ्या तालुका पोलीस स्टेशन च्या कर्मचारी यांच्या साठी दररोज
‘पाणी बाटल्या व बिस्किटे ‘ देण्याचा उपक्रम पेन्सील चौक येथे सुरू करण्यात आला .या प्रसंगी
बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला
पोलीस निरीक्षक महेश ढवाण , बिमा चे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, नितीन जामदार, अभिजीत शिंदे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या महामारीत बंदोवस्त वरील कर्मचारी सकाळी 7 वाजल्या पासून पुढील आदेश येईपर्यंत चौका चौकात कर्तव्य बजावत असतात सामाजिक बांधिलकी जपत सदर उपक्रम लॉक डाऊन असे पर्यंत सर्व उद्योजकांच्या वतीने करणार असल्याचे धनंजय जामदार यांनी सांगितले.
माणुसकी जपत खाकी वर्दी बदल प्रेम दाखवत असे उपक्रम उद्योजकांनी सुरू केल्याबद्दल नारायण शिरगावकर यांनी समाधान व्यक्त केले