पिंपळी गावातील वाद मिटवल्यानंतर दोन्ही बाजू कडील मंडळी व संतोष ढवाणपाटील ,नामदेव शिंदे
जळोची फलटण टुडे वृत्तसेवा :
तालुक्यातील पिंपळी गाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार होणे साठी गावकरी व पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची भेट झाली व विविध विषयावर चर्चा झाली होती बरचसे वाद विकोपाला न जाता गाव पातळीवर सामोपचाराने मिटवू अशी ग्वाही नामदेव शिंदे यांनी दिली होती.
त्यातीलच एक शेतजमीनीचा वीस वर्षापूर्वींचा वाद पोलीस निरीक्षक शिंदे यांचे सूचनेनुसार संचालक श्री.संतोषराव ढवाण पाटील,सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, सदस्य आबासाहेब देवकाते, यांचे प्रयत्नातून व पंच कमिटीतील सदस्य सोना देवकाते पाटील,उमेश पिसाळ, आबासो मारुती देवकाते, महेश चौधरी आदींनी तुलसीदास केसकर व सर्जेराव पिसाळ आणि मच्छिंद्र पिसाळ या तिन्ही शेतकरी बांधवाना एकत्र विश्वासात घेऊन,बंधुभाव जपत बांधाचा वाद मिटवण्यासाठी विनंती केली. त्यास संबंधित शेतकऱ्यांकडून दुजोरा मिळाला व वीस वर्षपूर्वीचा वाद मिटविण्याच्या शिंदे व ढवाण पाटील आणि सरपंच मंगल केसकर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.
बांधावरील वाद आनंददायी वातावरणात मिटल्यानंतर संबंधित शेतकरी व गावातील पदाधिकारी आदींनी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे साहेब व कोरोनाकाळात नागरिकांना सुरक्षा कवच देणाऱ्या शहर पोलीस स्टेशनचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना सॅनिटायजर भेट देऊन आभार मानले.
यावेळी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सह पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, पोलीस नाईक दादासाहेब डोईफोडे, पोलीस हवालदार, भारत ससाणे, नवनाथ शेंडगे, भगवान दुधे,सचिन कोकणे व सर्व बारामती शहर पोलीस स्टाफ त्याचप्रमाणे संचालक संतोषराव ढवाण पाटील, सरपंच मंगल केसकर, बारामती तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब देवकाते,उमेश पिसाळ, महेश चौधरी, आबासो मल्हारी देवकाते, सोना देवकाते, बापूराव केसकर, तुलसीदास केसकर, सर्जेराव पिसाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट: लॉकडाऊन च्या काळात सदर वाद आनंदानी व सामोपचाराने मिटला त्यामुळे पिंपळी गावात एकोपा राहिला व वाढणार आहे अशीच उत्तम विकास कामे व प्रगती होवो अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी व्यक्त केली.