सीताराम वाबळे
बारामती:
कारखेल भापकर वस्ती येथील सीताराम किसनराव वाबळे (वय वर्ष 68 ) यांचे गुरुवार 06 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.कारखेल च्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान होते.कारखेल विविध कार्यकारी सोसायटी चे सदस्य व चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले.जिद्द चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर जिरायत शेती असताना सुद्धा त्यांनी उत्कृष्ट शेती करून मुलांना व भावंडाना उच्च शिक्षित केले.
पियाजो व्हेकिल्स कंपनीचे कामगार नेते कुंडलिक वाबळे यांचे ते वडील व जमशेतपूर (बिहार) येथील टाटा कंपनीचे व्यवस्थापक जालिंदर वाबळे हे बंधू आहेत. तर दैनिक पुढारी चे पत्रकार व सूत्रसंचालक, व्याखाते अनिल सावळेपाटील यांचे ते मामा होत.