वाठार निंबाळकर दि. 7 :
संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गावागावात विलगीकरण कक्ष स्थापन होत आहेत. वाठार निंबाळकर येथे सर्व सुविधा व सोयीयुक्त सुसज्ज विलगीकरण कक्ष एक प्रेरणादायी असून प्रत्येक गावाने याचा आदर्श घेतला पाहिजे तसेच आपले गाव पूर्ण कोरोना मुक्त झाले पाहिजे यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे असे मत श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.
वाठार निंबाळकर येथे लोकसहभागातून सुरू झालेल्या विलगीकरण कक्षासाठी वाठार निंबाळकर गावचे सुपुत्र सत्यजित नाईक-निंबाळकर डायरेक्टर शिंदे डेव्हलपर्स यांचे संकल्पनेतून व आर्थिक मदतीतून तसेच गावातील लोकसहभागातून अतिशय चांगल्या प्रकारे 45 बेड चे विलीनीकरण कक्ष स्थापन झाले असून या कक्षासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ नाळे यांनी दोन ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच गावातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी सुमारे 75 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर विलगीकरण कक्षासाठी डॉक्टर, नर्स तसेच उपस्थित पेशंटसाठी औषध व नाश्त्याची सोय गावातील तरुण वर्ग, सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक वर्गामध्ये सुसज्ज फॅन तसेच जनरेटर सुविधा, स्वच्छतागृहाची सुविधा तसेच पाणी फिल्टर सुविधा ही करण्यात आली आहे. या सुसज्ज अशा विलगीकरण कक्ष विषयी
प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार साहेब ,गटविकास अधिकारी मॅडम इत्यादी अधिकारी वर्गाकडून व सर्व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. यावेळी श्रीराम कारखान्याचे संचालक महादेवराव माने , फलटण शहराध्यक्ष मिलीद आप्पा नेवसे , जगन्नाथ उर्फ भाऊसाहेब कापसे , युवा उघोजक तुषारभैय्या नाईक निंबाळकर व वाठार निंबाळकर ग्रामस्थ उपस्थित होते .