पेन्सील चौक येथे पोलीस तपासणी करत असताना (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती:
बुधवार 05 मे पासून कडक लॉकडाऊन बारामती तालुक्यात होत असताना मात्र एमआयडीसी मधील उद्योगांना त्यातून वगळल्या मुळे लॉकडाऊन ला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
पेन्सील चौक,कल्याणी कॉर्नर, पियाजो व कटफळ व श्रायबर डायनॅमिक्स चौक येथे वर्दळ दिसत होती तर पेन्सील चौक येथे चारही बाजूला बॅरिकेट टाकण्यात आले होते.
सकाळी विविध कंपनीत पहिल्या पाळीत जाणारे कर्मचारी व अधिकारी
व महिला शासकीय रुग्णालय,मेडिकल कॉलेज,परिवहन विभाग ,एसटी मध्ये जाणारे कर्मचारी त्यांची विविध वाहने यांची लगबग दिसत होती तर बंदोवस्त वर असणारे अधिकारी व कर्मचारी हे कामगारांना अडवून कंपनीचे किंवा त्या खात्याचे ओळखपत्र पाहून पुढे जाऊन देत होते.विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात वर्दळ असणारा पेन्सील चौक मध्ये मात्र आज तुरळक वाहतूक दिसत होती.
तालुका पोलीस स्टेशन च्या वतीने चौख पोलीस बंदोवस्त ठेवण्यात आला होता यावेळी सहायक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते,वाहतूक हवालदार रमेश साळुंके,पोलीस हवालदार दत्तात्रय कुंभार,भुलेशवर मरळे, महिला कॉन्स्टेबल सीमा चौधर,गृह संरक्षक दल चे रोहित शिंदे,राहुल खरात,अमर मोरे आदी या वेळी उपस्तीत होते.
चौकट:
संपूर्ण बारामती तालुक्या मध्ये कडक लॉकडाऊन होत असताना बारामती एमआयडीसी परिसरातील सर्व छोट्या मोठ्या कंपन्या चालू ठेवण्यात येत आहेत त्यामुळे एमआयडीसी परिसरात जो पर्यंत लॉकडाऊन आहे तो पर्यंत वर्दळ चालू राहणार त्यामुळे कोरोना नियंत्रणात येईल का या विषयी उपस्तीत कामगार शंका व्यक्त करत होते
कंपनी तुन कर्मचारी घरी,गावात सर्वामध्ये मिक्स होणार व परत दुसऱ्या दिवशी कंपनीत कामावर येणार त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो त्यामुळे एमआयडीसी सुद्धा बंद पाहिजे त्यासाठी प्रशासन व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे लेखी तक्रार करणार असल्याचे जाणीव संघटना व पेन्सील चौक व्यापारी असोसिएशन ने सांगितले.