वाचन साखळी या नाविन्यपूर्ण उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे वाचन साखळी वर्षपूर्ती सोहळ्याचे व सोबतच आयुष्यरेखा काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याचे आयोजन संयोजिका श्रीमती प्रतिभा लोखंडे ,श्रीमती प्रतिभा टेमकर व वाचन साखळी समूहाचे सर्व सदस्य यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध बाल साहित्यकार मा.श्री.राजीव तांबे उपस्थित होते.त्यांनी आपल्या मनोगतात वाचन साखळी हा कौतुकास्पद उपक्रम असून त्यातून दर्जेदार कवी व लेखक तयार व्हावेत असे मत व्यक्त केले तसेच नवीन लेखक,कवी यांनी दर्जेदार व वाचनीय पुस्तक तयार करून ते वाचका समोर आणावेत असे मत व्यक्त केले. बालकांसाठी काही साहित्य निर्मिती करायची असेल तर मी सदैव तयार असल्याचे सांगितले.तसेच कवी सी .लक्ष्मण (लक्ष्मण चिमले) लिखित आयुष्यरेखा या काव्यसंग्रहास भरभरून शुभेच्छा दिल्या. वाचन साखळीच्या संयोजिका प्रतिभा लोखंडे व प्रतिभा टेमकर यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये वाचनसाखळी समूहाच्या संयोजिका श्रीमती प्रतिमा लोखंडे मॅडम यांनी प्रेरणादायी शब्दात वाचन साखळी समूहाची यशस्वी गाथा सांगितली. अगदी मोजक्या सदस्यांपासून तयार झालेली वाचनसाखळी एका वर्षात सुमारे ३५०० सदस्य पर्यंत पोहोचली असल्याचे आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे वाचन साखळी समूहातील उत्कृष्ट कवी सी. लक्ष्मण यांच्या आयुष्यरेखा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.त्याचबरोबर वाचन साखळी वाढवण्यासाठी ज्यांचे ज्यांचे योगदान होते त्या सर्वांचा नामोल्लेख केला. त्यानंतर कवी लक्ष्मण चिमले यांच्या
आयुष्यरेखा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले, यावेळेस कवी सी.लक्ष्मण यांनी आपण पहिली कविता 2014 साली केली व आता लॉकडाऊन मध्ये वाचन साखळीमुळे हा माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशन करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ.प्राची साठे(शैक्षणिक सल्लागार व माजी विशेष कार्याधिकारी, मुंबई), मा. श्री.विठ्ठल भुसारे शिक्षणाधिकारी (मा) परभणी, मा.डॉ.विशाल तायडे(वरिष्ठअधिव्याख्याता, डायटऔरंगाबाद), मा.श्री.हनुमंत चांदगुडे (कवी व गीतकार,बारामती), मा.नेहा भांडारकर, (कवयित्री व लेखिका,नागपूर), मा.श्री.मोहन शिरसाट (कवी, वाशिम), मा. श्री.प्राणजीत बोरसे(चित्रकार, औरंगाबाद) इत्यादी प्रमुख पाहुणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. मा.भुसारे साहेब यांनी ‘तुफानातील दिवे’ ही काव्य रचना गायन करून उपस्थितांची मने जिंकली.
वाचन साखळी समूहाचे प्रातिनिधिक स्वरूपात सदस्य म्हणून श्री. गणेश तांबे,श्री योगेश आहेर,श्रीमती नीता खोत,श्रीमती दिपाली जोशी,श्री.गणेश गडदे यांनी आपल्या मनोगतातून वाचन साखळी विषयीचे उत्कृष्ट अशा शब्दात अनुभव सांगितले.
वाचनसाखळी वर्षपूर्ती सोहळा फेसबुक ऑनलाईन यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य विक्रम अडसूळ (ATM राज्य संयोजक, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक),नारायण मंगलारम(ATM सहसंयोजक, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक) यांनी थोडक्यात सुंदर असे मार्गदर्शन केलं व कार्यक्रम ऑनलाइन यशस्वी घडवून थआणला. सदर कार्यक्रम फेसबुक ऑनलाईन असल्यामुळे असंख्य वाचक, लेखक, कवी, मित्र परिवार यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. नाविन्यपूर्ण उपक्रमास आपल्या शुभेच्छा संदेशाद्वारे आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती. प्रतिभा लोखंडे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन अनुजा चव्हाण
व प्रतिभा टेमकर यांनी केले. मग कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम उत्कृष्ट लेखक श्री. कचरू चांभारे सर यांनी केले.