खाजगी हॉस्पिटलना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यास सद्यस्थितीत मंजूरी नाही ; ऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर देणार परवानगी —- प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे



  सातारा दि. 3 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये (DCHC, DCH  व  CCC) मिळून एकूण 82 हॉस्पिटलमध्ये आज रोजी 16 हजार 626 इतके कोरोन संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 12 हजार 447 रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. एकूण 82 हॉस्पिटल पैकी 58 खाजगी हॉस्पिटल यांना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यात एकूण 20 खाजगी हॉस्पिटल  प्रशासनाने त्यांच्याकडील सुरु असलेले हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजूरीसाठी सादर केलेले आहेत. तथापि, ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे या खाजगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करुन मंजूरी देणे उचित ठरणार नाही. परंतू, भाविष्यात ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शनची आवश्यकतेनुसार उपलब्धता झाल्यास या सर्व 20 खाजगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्याबाबत तात्काळी मंजूरी देण्यात येईल असे, प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी कळविले आहे.
सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात दैनंदिन लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा कमी ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. तसेच अत्यावश्यक रुग्णांना उपचाराकरीता आवश्यक असणारे रेमडिसीवर इंजेक्शनसुध्दा  कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत वरिष्ठ कार्यालय आणि शासनस्तरावर ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शन उपलब्ध होण्याकरीता युध्द पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे. लवकच सातारा जिल्ह्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शन्स उपलब्ध होतील असेही, प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!