बरड :
फलटण तालूक्यातील बरड येथे नुकतेच भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते . यामध्ये ग्रामस्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले यामध्ये 87 लोकांनी रक्तदान केले .
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आमदार दीपकराव चव्हाण , पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर , यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला .
समाज कार्याचा वसा घेतलेले व लोकांच्या व गावच्या विकासासाठी नेहमीच सक्रिय असलेले बरड ग्रामपंचायतचे धडाडीचे सदस्य श्री.शेखर काशिद व त्यांचे सहकारी आशुतोष शिंदे, राहुल गावडे, सुखदेव टेंबरे, ॠषीकेश लंगुटे यांनी शिवनंदन ब्लड स्टोअरेज,बारामती व श्री.भगवंत ब्लड बॅक,बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते .
यावेळी भाऊसाहेब कापसे,तुषार नाईक निंबाळकर, बापुराव जगताप, सरपंच तृप्तीताई गावडे, उपसरपंच गोरख टेंबरे, मा.सरपंच जनार्दन लोंढे, मा.चेअरमन दिलीपराव काशिद, पोलीस पाटील सौ.अश्विनी टेंबरे,ग्रा.पं.सदस्य प्रितम लोंढे,ग्रा.पं.सदस्य सौ.वनिता लंगुटे, ग्रा.पं.सदस्य गजानन गावडे, आर. एफ. ओ. राजेंद्र आटोळे , श्री.आकाश लोंढे ,श्री.अंकुश वाठारकर ,लतीफभाई शेख,गुणवंत बागाव, सुभेदार लोंढे, आप्पासो पिसाळ , पोपट काशिद,दादा मिसाळ,संजय शिंदे, डॉ. लंगुटे, डाॅ.शेख, डॉ. जमदाडे, डाॅ.माधुरी लोंढे, डाॅ.शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरास
महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेत हा कार्यक्रम पार पडला सर्व तरूणांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते यावेळी प्रत्येकाला एक झाडाचे रोप भेट देण्यात आले, यासाठी आर. एफ. ओ. राजेंद्र आटोळे यांंंचे सहकार्य मिळाले.