फलटण : फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण यांनी नुकतीच कोरोना बाबतची चाचणी केली असता त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आलेला आहे .
मागील अनेक दिवसांपासून आमदार दीपकराव चव्हाण कोरोना आढावा बैठकी घेत होते तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम याकडे लक्ष देऊन होते अनेक लसीकरण केंद्रावर भेट देत होते. नुकतीच त्यांना काही लक्षण जाणवल्याने कोरोना चाचणी केली असता त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून आमदार दीपक चव्हाण यांनी “मी घरीच होम क्वारंटाइन मध्ये उपचार घेत असून माझी प्रकृती उत्तम आहे . दरम्यान गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी , स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी”, असे आवाहन केले आहे .