पुणे दि. 1:
महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त नगरसेविका राजश्री नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सन युनिव्हर्स सोसायटी व लायन्स क्लब पुणे शताब्दी च्या वतीने महाराष्ट्र दिनी 1मे2021 रोजी क्लब हाऊस न.2 चे हॉल मध्ये घोलप मेमोरियल ब्लड बँक मार्फत कोव्हिडं दुसरी लाटे मुळे रक्तदान शिबिर सकाळी 9 ते दु.2 या वेळेत घेण्यात आले. सोसायटीच्या सभासदांनी व इतरांनी मिळून एकूण 134 रकदात्याने रक्तदान हेच श्रेष्ठदान म्हणून रक्तदान केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका राजश्री नवले माजी नगरसेवक बाळासाहेब नवले,लायन्स क्लब चे लायन मुखर्जी,प्रोजेक्ट चेअरमन आर के शाह,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सत्यशोधक रघुनाथ ढोक, सोसायटीचे चेअरमन प्रदीप नवले उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका नवले म्हणाले की कोव्हिडं च्या काळात रकदानाचा तुटवडा खूप मोठया प्रमाणात जाणवत असून तरुण पिढी पुढे येऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी केले त्याबद्दल पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.तर आमदार तापकीर म्हणाले की प्रत्येक प्रभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करून जास्तीतजास्त रक्तदाते तयार करावेत आपणास या महामारीला मोठ्या धर्याने लढा देऊन 3री लाट येणारच नाही या दृष्टीने काळजी घेऊ तसेच केंद्र व राज्य सरकारचे सर्व नियम पाळून प्रशासन ला योग्य सहकार्य करून वेळीच सर्वांनी लस घेऊन सुरक्षित रहाण्याचे यावेळी आवाहन देखील केले.यावेळी काही मुलींनी प्रथमच रक्तदान केल्याने त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.याप्रसंगी प्र.पाहुणे सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी देखील आवर्जुन रक्तदान केले.कोव्हिडं च्या दुसऱ्या लाटेत देखील 134 रक्तदाते म्हणजे विक्रमी रक्तदान झाले म्हणून आयोजकांचे सर्वांनी कौतुक केले. सर्व मान्यवरांचे शाल श्रीपळ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप लडकत तर शिबिराचे आयोजन सारंग नवले ,प्रकाश बाबर,गणेश राठोड यांनी केले आणि शेवटी आभार प्रदीप नवले यांनी मानले.मोलाचे सहकार्य ब्लड बँकेचे अध्यक्ष रोहिदास घोलप व त्यांच्या टीमने केले .