श्रायबर डायनॅमिक्स कडून कोविड रुग्णालयास ‘ऑक्सिजन’ ची मदत.
ऑक्सिजन सिलेंडर देताना जितेंद्र जाधव, जगन्नाथ मिश्रा,हेमंत चव्हाण,रावसाहेब मोकाशी व इतर (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती: ( फलटण टुडे वृत्तसेवा )
बारामती एमआयडीसी मधील महिला ग्रामीण रुग्णालय परिसरातील कोविड रुग्णालयास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन ची टंचाई लक्षात घेऊन श्रायबर डायनॅमिक्स डेअरी प्रा ली यांच्या वतीने मोफत ऑक्सिजन देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या प्रसंगी कंपनीचे रीजनल ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र जाधव
व ऍडमिन चे टीम लीडर रवींद्रनाथ मिश्रा,हेमंत चव्हाण,हनुमंत चव्हाण सुरेश कांबळे,वीरेंद्र गायकवाड ,रावसाहेब मोकाशी आणि सिल्व्हर ज्यूबली ग्रामीण रुग्णालय चे वैदकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे,महिला ग्रामीण रुग्णालय चे उपअधीक्षक डॉ बापूसाहेब भोई,ऑक्सिजन प्लँट चे प्रमुख महेश वानखेडे आदी मान्यर उपस्तीत होते.
“उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या सूचनेनुसार सामाजिक बांधिलकी जपत कंपनीच्या वतीने दररोज ऑक्सिजन ने भरलेले दहा सिलेंडर सलग तीस दिवस कोविड रुग्णालयास दिले जाणार आहे व सामाजिक कार्य करण्यासाठी श्रायबर डायनॅमिक्स कटिबद्ध असल्याचे” प्रतिपादन रीजनल ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र जाधव यांनी केले.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पूर्वी कंपनीने डायलिसिस मशीन दिल्या आहेत व आता मोफत ऑक्सिजन देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून इतरांनी याचा आदर्श घ्यावा” असे डॉ सदानंद काळे यांनी आव्हान केले.