बरड दि. 29 :
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण होण्यासाठी प्रयत्न सुरू असून जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी शासनस्तरावरती प्रयन्त केले जात आहेत. यानिमित्ताने फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी बरड प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून तेथे सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची माहिती घेऊन लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. साळूंखे व आरोग्य कर्मचारी यांना काही सूचना केल्या व त्यांनी यावेळी आतापर्यंत किती लसीकरण झाले याबद्दल माहिती घेतली तसेच इतर केंद्राच्या लसीकरणा बाबत चर्चा केली . तसेच लसीकरण केंद्रावर होणारी संभाव्य गर्दी व वादविवाद टाळण्याकरीता काही सूचना त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. गितांजली साळूंखे यांना दिल्या . याचबरोबर लसीकरण मोहिम व केंद्र सुरळीत चालवल्या बद्दल आरोग्य अधिकारी डॉ. गितांजली साळूंखे व त्यांचे सह आरोग्य कर्मचारी यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत डॉ. गितांजली साळूंखे व त्यांच्या टिमचे कौतूक केले. यावेळी लसीकरण मोहिमेस लागणारी हवी ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले व संपूर्ण केंद्राची पाहाणी केली. यावेळी बरड ग्रामपंचायत सदस्य शेखर काशिद , आसू गावचे युवा उद्योजक ज्ञानेश्वर भोई , विनोद गाडे ,आरोग्य कर्मचारी व बरड ग्रामस्थ उपस्थित होते.