बारामती:
उन्हाळा व दिवाळी मध्ये लग्नसराई मोठ्या प्रमाणावर असते त्यामध्ये निवेदक मंडळी मोठ्या प्रमाणावर अवलुबन असतात परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग
दुसऱ्या वर्षी कडक लॉकडाऊन मध्ये मर्यादित लोकांच्या उपस्तीत लग्न सोहळयाची अट घातल्याने
निवेदकाचा व्यवसाय प्रचंड अडचणीत सापडला आहे.
मर्यादित लोकांच्या उपस्तीत लग्न सोहळा होत असल्याने निवेदका ला कोणीही बोलवित नाही त्यामुळे गेल्या वर्षी आर्थिक संकट उभे राहिले होते या वर्षी तरी हे संकट जाईल अशी अपेक्षा होती परंतु या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर अपेक्षा भंग झाला आहे. ना शासना कडून मदत ना कोणत्या ही सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत नाही.
या वर्षी लॉकडाऊन पडण्या आधी काही पार्ट्या नी एप्रिल,मे महिन्यातील लग्नासाठी आगाऊ रक्कम दिली परंतु लॉकडाऊन जाहीर झाले व सर्व लग्ने रद्द झाली किंवा काही जणांनी शासनाच्या निर्णया नुसार मर्यादित लोकांच्या उपस्तीत लग्ने लावली त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याची खंत निवेदक सलीम सय्यद यांनी सांगितले.
निवेदक,सूत्रसंचालक हा व्यवसाय गर्दी शी समरस होणारा व्यवसाय आहे व कोरोना मुळे गर्दी नाही त्यामुळे व्यवसाय नाही त्यामुळे आर्थिक संकट उभे राहत आहे शासनाने या व्यवसाय साठी मदत करावी असे मत निवेदक धनराज नींबाळकर यांनी व्यक्त केले.
त्या त्या भागातील अनेक राजकीय पुढारी,सामाजिक कार्यकर्ते यांना विविध कार्यक्रमात नाव,पद घेऊन खूप मोठी प्रसिद्धी निवेदक देतात त्यावेळी त्या निवेदकाची खूप स्तुती केली जाते त्यास मान दिला जातो परंतु सद्या लॉकडाऊन मध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या निवेदक मंडळींना मदत करण्यासाठी कोणीही दानशूर पुढे येत नसल्याबद्दल निवेदक मंगेश डहाके यांनी खंत व्यक्त केली.
लग्नसराई वर असंख्य छोटे व्यवसाईक अवलुबन आहे त्यापैकी निवेदक हा आहे लॉकडाऊन मध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या या निवेदकास शासनाने मदत करावी अशी अपेक्षा निवेदक करीत आहे.