जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
कटफळ येथे ग्रामपंचायत कटफळ व आरोग्य विभाग यांच्या वतीने कोरोना अँटीजन तपासणी कॅम्प आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये २३४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणी मध्ये ज्यांच्या घरामध्ये पॉझीटिव्ह पेशंट आहे त्यांचे नातेवाईक , गावातील व्यवसायिक दुकानदार , कामगार वर्ग , पदाधिकारी , व ज्यांना लक्षणे आहेत अशांची अँटीजन तपासणी करण्यात आली होती. यामध्ये २२ जणांचे रिपोर्ट पॉझीटिव्ह आले. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली होती.
यासाठी शिर्सुफळ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य एजगर यांच्या मार्गदर्शनाखाली कटफळ येथील सी.एच.ओ. डॉ.नयन झेंडे , प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संजय चौरे, पांडुरंग गायकवाड, जयमाला राशीनकर , डॉ.संजय मोकाशी , उपसरपंच संग्रामसिंह मोकाशी ,किरण कांबळे , सिताराम मदने , सुनील मोरे, तात्याराम रांधवण , राजेंद्र झगडे ,विजय कांबळे , धनाजी लोखंडे व ग्रामसेवक महेंद्र बेंगारे व ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.