फलटण :
संपुर्ण जगाला अहिंसा,दया,शांती,मैञी व जगा आणी जगुद्या हा सदेश देणारे भगवान महावीर जन्मकल्यांणक जैन सोशल ग्रुप,फलटणच्या वतीने विविध कार्यक्रमा द्वारे साजरे करण्यात आले.
कोरोना पार्श्वभुमिवर गर्दी न करता भगवान महावीर किर्तीस्तंभ येथे महावीरांच्या प्रतीमेला पुष्पहार व साखर गाठी अर्पण करुन पुजन करण्यात आले. तसेच जिवदया योजने अंतर्गत फलटण शहरातील गोमाता व वासरांना एक ट्राली चारा वाटप करण्यात आला.
कोरोना मुळे सद्या सर्वञ रक्तटंचाई असल्याने जैन सोशल ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देउन २७ श्रावक-श्राविकांनी व युवक-युवतीनी रक्तदान करुन भगवान महावीर जन्म कल्यांणक साजरे केले .
यावेळी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डाॅ.सुर्यकांत दोशी,सचिव श्रीपाल जैन,मा.अध्यक्ष डाॅ.संतोष गांधी,उपाध्यक्ष अजित दोशी,फलटण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी,मेबर शिप ग्रोथ चेअरमन डाॅ.अशोक व्होरा ,संचालक राजेंद्र कोठारी(बुधकर),अजित दोशी,संचालीका स्मिता शहा,युवा फोरमचे अध्यक्ष सिध्देश शहा व सहकारी उपस्थीत होते.
रक्तदान कार्यक्रमासाठी फलटण ब्लड बॅकेचे अध्यक्ष डाॅ.बिपीन शहा,सचिव डाॅ.संतोष गांधी,संचालक डाॅ.रुषीकेश राजवैद्य व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. चारा वाटपासाठी दंपती सदस्यांनी योगदान दिले. या प्रसंगी सर्व रक्तदाते, चारा वाटप दातार यांचे जैन सोशल ग्रुपच्या वतीने आभार व्याक्त करण्यात आले. कार्यक्रमासाठी युवा फोरमचे सहकार्य लाभले .