फलटण ( प्रतिनिधी) :
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील श्रीमती अंजनाबाई नारायण गावडे ( ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांचे पश्चात पाच मुली, दोन मुलगे,सुना, नातवंडं असा परिवार आहे.
गोखळीचे माजी सरपंच नंदकुमार गावडे यांच्या त्या मातोश्री होत.गोखळी येथील स्मशानभूमीत कोरोना प्रतिबंधक नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले.