फलटण :
प्रकाश गायकवाड हे नाव उद्योग तसेच सेवा क्षेत्रात फार मोठ्या आदराने घेतले जाते हे प्रकाश गायकवाड आता पश्चिम महाराष्ट्राचे आशास्थान व विश्वास झाले आहेत गेली दोन वर्ष कोविड असल्यामुळे लोकांना वाचवण्यासाठी अनेक कोरोना योद्धा पुढे आली आहेत मात्र लोकांना प्राणवायू पुरवण्याचे काम करून उद्योगपती प्रकाश गायकवाड फार मोठे योगदान ठरले आहे
गेले दोन वर्षे कोविड आला. लोकांना वाचवण्यासाठी अनेक कोविड योद्धे झटत आहेत. मात्र लोकांना प्राणवायू पुरवण्याचे काम करून उद्योगपती प्रकाश गायकवाड हे फार मोठे कोविड योद्धे ठरले आहेत.
सिंधुदुर्गात प्रकाश गायकवाड हे नाव उद्योग तसेच सेवाभावी क्षेत्रात फार मोठ्या आदराने घेतले जाते. हेच प्रकाश गायकवाड आता पश्चिम महाराष्ट्राचे श्वास झाले आहेत.
देवगड मधील नामांकित उद्योगपती श्री. प्रकाश गायकवाड यांनी 24 / 12 क्रायोजेनिक गॅस इंडस्ट्रीज नावाची ऑक्सिजन निर्माण करणारी कंपनी काही दिवसापूर्वी उभारली.
देवगड मध्ये सामाजिक कामाचा डोंगर उभा करणाऱ्या प्रकाश गायकवाड यांनी या कंपनीच्या मदतीतून पुणे शहर, हवेली तालुका, भोर ,खंडाळा, पुरंदर तालुका, ग्रामीण हवेली व बारामती या परिसरातील 65 हॉस्पिटलला अखंडित ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवला आहे.
सुमारे दोन ते अडीच हजार पेशंटना पुरेल एवढा ऑक्सिजन ते उत्पादन करतात आणि वितरित करत आहेत ऑक्सिजन निर्मितीसाठी सध्या रॉ मटेरियल शासन पुरवते आहे.
मात्र लोकांचे जीव वाचावेत म्हणून प्रकाश गायकवाड यांच्यासारखी सेवाभावी माणसे रात्रंदिवस झटत आहेत. ज्यावेळी कोविडची लाट आली त्या आधी व नंतर सतत दोन वर्षे प्रकाश गायकवाड व त्यांची कंपनी ऑक्सिजन निर्मितीत प्रचंड मोठी मेहनत घेत आहे.