डब्बे पोच करताना ओम साई श्याम स्टील चे पदाधिकारी (छाया अनिल सावळेपाटील)
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती एमआयडीसी मधील ओम साई श्याम स्टील वर्क्स यांच्या वतीने बारामती शहरातील खाजगी रुग्णालयातील कोरोना रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईक यांच्या साठी गुणवत्ता व दर्जात्मक मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.ज्या कोरोना रुग्णालयातून फोन येईल त्यांना डब्बे पोच केले जातात बारामती शहरातील जवळपास 7 ते 8 रुग्णालयात दुपारी 12 ते 4 या वेळात जवळपास 100 ते 150 डब्बे पोच केले जातात या मध्ये प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या भाज्यांचा व 2 अंडी चा समावेश असतो आप्पासो आटोळे,पोपट केसकर,नवनाथ गावडे,पोपट पांढरे,वैभव आटोळे,अंबादास गावडे,अक्षय गावडे आदी रोज डब्बे पोच करण्याची जवाबदारी आनंदाने पूर्ण करतात.प्रत्येक रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या नातेवाईक यांच्या साठी मोफत डब्बे पोच करण्याची सुविधा म्हणून मोबाइल नंबर दिलेले असतात त्या प्रमाणे नातेवाईक संपर्क साधतात व समाधान व्यक्त करतात.
———————————–