बारामती:
देसाई इस्टेट येथील रहिवासी पै. नूरमहमंद बुऱ्हाण शेख (वय वर्ष 80) यांचे रविवार 25 एप्रिल रोजी सिल्व्हर ज्यूबली रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले
गेल्या 4 दिवसापासून ते रुग्णालयात दाखल होते. बारामती शहर व परिसरात कावीळ कोणास झाली तर कावीळ उतवरणारे ‘चाचा’ म्हणून ते प्रसिद्ध होते.
जिद्द चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर सर्व सामान्य परिस्थिती असताना त्यांनी छोटी मोठी कामे करीत 2 मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर व्यवसायात उभे केले .2 मुले व 1 विवाहित मुलगी असा परिवार असून देसाई इस्टेट मधील श्री गणेश तरुण मंडळ चे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते साहिल,साजिद,जावेद व शाहरुख ही त्यांची नातवंड होत.