बारामती:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये सर्व प्रार्थना स्थळे बंद आहेत त्यामुळे तृतीयपंथी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा प्रसंगी त्यांच्या मदतीसाठी रुई येथील
पुणे जिल्हा पोलीस मित्र संघटना महिला अध्यक्ष व त्रिवेणी ऑईलच्या संचालिका शुभांगी चौधर मदतीसाठी पुढे सरसावले आहे.बारामती शहरातील तृतीयपंथी यांच्या साठी जीवनावश्यक वस्तू चे किट वाटप करण्यात आले.
सदर उपक्रमा साठी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी मार्गदर्शन केले.शहरातील
तृतीयपंथी या सर्वांना शहर पोलीस स्टेशन मध्ये किट वाटप करण्यात आले. या वेळी
बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे ,पोलीस मित्र संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष शुभांगी चौधर ,सूरज तावरे,पोलीस कर्मचारी बापूसाहेब जगदाळे,अनिल ओमासे आदी उपस्तीत होते.
“सामाजिक भान व जाण जपत त्रिवेणी उद्योग समूहांनी पोलीस प्रशासनाला सकारत्मक प्रतिसाद देत माणुसकी च्या भावनेतून तृतीयपंथी साठी केले कार्य कौतुकासद असून समाज्यातील दानशूर व्यक्तींनी आशा विविध सामाजिक उपक्रमां साठी पुढे यावे” असेही आव्हान या वेळी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले.
Nice work madam ji. Hats off you