दादा आव्हाड यांचा सत्कार करताना लकडे,करळे
बारामती:
अयोध्या येथे राष्ट्रीय वरिष्ठ गट कब्बडी स्पर्धचे आयोजन दि. १२ ते १६ एप्रिल दरम्यान करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र कब्बडी संघाने तृतीय क्रमांक मिळविला या संघामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा बारामतीचा एकमेव प्रो कबड्डी खेळाडू दादासाहेब आव्हाड यांचा शनिवार दि. २४ एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे व बारामती तालुका क्रीडा कार्यालयच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू व बारामती तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल देसाई इस्टेट येथे सत्कार करण्यात आला व पुढील काळात दादासाहेब आव्हाड यांच्याकडून तालुक्यातील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवावेत व त्याकरिता योग्य ती मदत केली जाईल असे प्रतिपादन तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केली यावेळी जिल्हा क्रीडा संकुलमधील कर्मचारी/मार्गदर्शक रविंद्र करळे, अभिमन्यू इंगुले उपस्थित होते.