फलटण : फलटण संस्थान अधिपती तथा महाराष्ट्र विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फलटण मेडिकल फाऊंडेशन संचलित येथील रक्तपेढीच्या सहकार्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन मंगळवार पेठ फलटण येथे 21 एप्रिल 2021 रोजी रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे श्री.सनी अहिवळे, आरोग्य सभापती, फलटण नगर परिषद फलटण व श्री.हरीश काकडे (आप्पा), सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजे गट यांनी सांगितले
कोरोना महामारी मध्ये समाजाची गरज ओळखून आयोजित केलेले रक्तदान शिबिर कौतुकास्पद असल्याचे नमूद करत मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर मा.अध्यक्ष, सातारा जिल्हा परिषद, युवा नेते मा.श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, यांनी कौतुक केले शिबिराच्या यशस्वी आयोजन तसेच उत्तम नियोजनाबद्दल सर्वाना धन्यवाद दिले
श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.महादेव माने, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर (भैय्या) यांनी शिबिरास सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या
या रक्तदान शिबिराचे आयोजन नगरसेवक तथा आरोग्य सभापती श्री.सनी संजय अहिवळे तसेच श्री.हरीश काकडे (आप्पा) सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजे गट श्री.संग्राम अहिवळे राजे समर्थक, श्री.अक्षय अहिवळे बिल्डर यांनी केले होते
या रक्तदान शिबिरास शक्ती भोसले, सनी काकडे, शिवा अहिवळे, प्रवीण काकडे(सर) आदी मान्यवरानी शिबिरास सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या