फलटण – फलटण नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी संदेश चव्हाण यांचे आज रोजी फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोना संंसर्गाने मृत्यू झाला.संदेश यांच्या मृत्यूमुळे फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षीपासुन आजतागायत कोरोना योध्दा म्हणुन संदेश हे आपले कर्तव्य बजावत होते.रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करणे असो वा इतर कामे असो संदेश हे आपले काम चोखपणे पार पाडत असत.संदेश यांच्या जाण्याने एक चांगला कर्मचारी तसेच एक कर्ता पुरुष आपल्यातुन निघुन गेल्याची खंत होत आहे.संदेश यांच्या पश्चात पत्नी,मुले,आई,वडिल असा परिवार आहे.