फलटण दि.१४ :
सातारा जिल्ह्यातील फलटणमध्येही अत्यंत धुमधडाक्यात आणि अफाट भीमानुयायांची भव्यदिव्य मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने १४ एप्रिल रोजी निघत असते. परंतु कोवीडच्या भयानकतेमुळे गेल्या वर्षी आणि यावेळी सुद्धा आपापल्या घरातून शांततेने व तेवढ्याच आनंद उत्साहने भीमजयंती साजरी केली जात आहे. १४ एप्रिल सकाळी १० वा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.तसेच दिवसभर फलटण मधील प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक चळवळीतील नेते, पुढारी, कार्यकर्ते पुष्पहार घालून अभिवादन केले विशेष करून भीम अनुयायी सोशल डिस्टन्स, मास्क घालून बाबासाहेबांना पुष्पहार घालून अभिवादन करत होते.
भीमजयंती फंडाच्या माध्यमातून आंबेडकरी विचार, प्रतिमा, साहित्य, समाजामध्ये वेळेवेळी पोहचवण्यात येणार आहे. याचाच एकभाग म्हणून २०२० मध्ये भीमजयंती फंडाच्यावतीने संविधानाची प्रस्ताविका, १९८५ ते २०२० पर्यंतच्या भीमजयंतीचे दुर्मिळ फोटो व भीमसंदेश असलेल्या वह्या आणि यावर्षी बाबासाहेबांचा फोटो प्रकाशित करून घराघरात मोफत पोहचवण्यात येत आहे.
क्रांतीसूर्य प्रतिष्ठान तर्फे आंबेडकर चौकात सॅनिटायझर आणि मास्क वाटप केले, भ्रष्टाचार जनशक्ती तर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले,हरिष काकडे यांनी संविधान प्रास्ताविका वाटप करून जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
– डिजिटल जयंती साजरी करत असताना १४ एप्रिला सोशल डिस्टन्सिग ठेवत एकाच वेळी म्हणजे सायं. ७ :१५ वाजता आंबेडकर चौक, समाजमंदिर, बुध्दविहार, जुनी चावडी, धम्मयान चौक, पंचशील चौक आणि घराघरात बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या प्रतिमांना सजावट करून अभिवादन केले.
बाबासाहेबांसारख्या विद्वान, समाजसुधारक अशा महापुरूषाची जयंती वैचारीक व्हायला पाहीजे म्हणून
बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या ग्रंथसंपदेचं वाचन व्हावे आणि बाबासाहेबांचे विचार घराघरात रूजवण्याचे काम जयंती मंडळ करणार आहे.
जयंती समितीचे अध्यक्ष विजय येवले, उपाध्यक्ष हर्षल लोंढे, कार्याध्यक्ष संजय गायकवाड, सचिन प्र. अहिवळे, उमेश कांबळे, सनी काकडे, विकी काकडे, महेश जगताप, शाम सु. अहिवळे जयंती मंडळ सदस्य यांनी लोकप्रतिनिधी सचिन अहिवळे, सनी अहिवळे, सुधीर अहिवळे, चंदन काकडे आणि नगरपरिषद व पोलीस प्रशासनाचे जयंती समितीस सहकार्या बद्दल आभार व्यक्त केले.