बारामती एमआयडीसी मधील जी टी इन कंपनीने कामगारांचा बाहेर संपर्क कोणाशी येऊ नये या साठी कंपनीच्या आवारात 90 टक्के कामगारांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था कोरोनाचे सर्व नियम पाळून केली आहे फक्त 10 टक्के अधिकारी व कर्मचारी याना बारामती शहरातून येजा करण्यासाठी ओळ्खपत्रावर परवानगी मागितली आहे. जी टी इन प्रशासनाने दातृत्व दाखविले या बदल कामगारा मधून समाधान होत व्यक्त होत आहे शासनाचे महसूल बुडू नये कामगार लॉक डाऊन च्या भीतीने त्यांच्या गावी जाऊ नयेत या भीतीने राहण्याची व जेवणाची सोय केल्याचे जी टी इन कंपनी चे सरव्यवस्थापक उद्धव मिश्रा यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात एमआयडीसी कर्मचाऱ्यांना पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे: बारामती चेंबर ची मागणी
जळोची:
गुरुवार 15 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या लॉक डाऊन मध्ये एमआयडीसी मधील अत्यावश्यक सेवा मध्ये येणाऱ्या कंपनी मधील अधिकारी व कर्मचारी यांना कंपनी ने दिलेल्या ओळ्खपत्रावर जा ये करण्यास परवानगी साठी बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंद्रसटीज ने प्रांताधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे.
बारामती एमआयडीसी मध्ये माल निर्यात करणाऱ्या कंपन्या व त्यांचे पुरवठा दार त्यामध्ये आय एस एम टी, डी मेक,भारत फोर्ज, पियाजो व्हेकीकल्स तर शेती विषयक आणि खते तयार करणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या व त्यांना कच्चा माल पुरवठा करणाऱ्या कंपन्या,वैदकीय क्षेत्रातील मास्क ,सॅनिटायझर बनविणे,अत्यावश्यक क्षेत्रातील श्रायबर डायनॅमिक्स,बारामती कॅटल फीड्स तर अन्न उद्योग क्षेत्रातील फेरेरो इंडिया,बाऊली, टेक्स्टाईल पार्क क्षेत्रातील मास्क बनविणाऱ्या कंपन्या व इतर कंपन्या व त्यांचे पुरवठा दार यांना कंपनीने दिलेल्या ओळख पत्रावर जाणे येणे साठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी बारामती चेंबर्स चे अध्यक्ष प्रमोद काकडे व कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी केली आहे.
चौकट: