जळोची (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
अयोध्या येथे 13 ते 16 एप्रिल दरम्यान होणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धे साठी महाराष्ट्र पुरुष संघात बारामती स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष व जिल्हा क्रीडा संकुल चे खेळाडू दादासो आव्हाड यांनी निवड झाली आहे.
या स्पर्धेच्या संघ निवडी करिता बारामती मध्ये निवड चाचणी स्पर्धे घेण्यात आली होती. संघाचे सराव शिबीर बारामती मध्ये 27 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत पार पडले होते.बारामती स्पोर्ट्स अकॅडमी च्या माध्यमातून आव्हाड यांनी विविध राज्य व राष्ट्रीय खेळ स्पर्धेचे आयोजन केले आहे त्याच प्रमाणे राज्य व राष्ट्रीय खेळाडू तयार होण्यासाठी सराव करवून घेतात या पूर्वी प्रो कबड्डी सामन्यात सहभाग घेतला आहे.हायटेक टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक हनुमंत पाटील,तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे,जिल्हा क्रीडा संकुल तांत्रिक समिती सदस्य अविनाश लगड,बारामती स्पोर्ट्स अकॅडमी चे अजिनाथ खाडे, राजेंद्र गोफने,मोहन कचरे,दत्ता चव्हाण,रवींद्र कराळे, अभिमन्यू इंगोले आदी नी सदर निवडी बदल अभिनंदन केले आहे.