डायलिसिस मशीन लोकापर्ण करताना अजित पवार व जितेंद्र जाधव,मंजुश्री चव्हाण,रवींद्रनाथ मिश्रा,मुकेश चव्हाण व इतर मान्यवर (छाया अनिल सावळेपाटील)
————————————
बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :
बारामती एमआयडीसी मधील श्रायबर डायनॅमिक्स डेअरी प्रा ली च्या सी एस आर फंडा च्या माध्यमातून बारामती एमआयडीसी येथील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे डायलिसिस मशीन भेट देण्यात आले त्याचा लोकापर्ण सोहळा शनिवार दि.10 एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णालयात संपन्न झाला.
या प्रसंगी कंपनीचे रिजनल ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र जाधव,बिझनेस स्पोर्ट मॅनेजर मंजुश्री चव्हाण,टीम लीडर ऍडमिन रवींद्रनाथ मिश्रा,टीम अडव्हाजर एच आर मुकेश चव्हाण व प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,वैदकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे,डॉ बापूसाहेब भोई, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,गटनेते सचिन सातव व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर आदी मान्यवर उपस्तीत होते.
श्रायबर डायनॅमिक्स कंपनीचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून बारामती परिसरातील ग्रामीण भागात सी एस आर फंडातून कंपनीने अनेक सामाजिक उपक्रमास हातभार लावला आहे सद्याची रुग्णाची गरज ओळखून डायलिसिस मशीन युनिट देण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिपादन केले.
” कंपनी नेहमीच सामाजिक कार्यात या पूर्वी अग्रेसर होती व या नंतर सुद्धा सामाजिक भान व जाण जपत कार्यशील राहू” अशी ग्वाही कंपनीचे रिजनल ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र जाधव यांनी दिली.
या प्रसंगी डॉ सदानंद काळे यांनी रुग्णांसाठी कंपनीने घेतलेला पुढाकार महत्वाचा असल्याचे सांगून आभार व्यक्त केले.