प्रांताधिकारी याना निवेदन देताना धनंजय जामदार व इतर (छाया अनिल सावळेपाटील)
जळोची (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
लॉक डाऊन आदेशातील कामगारांच्या आर टी पी सी आर चाचणीची जाचक अटी रद्द करणे व व्यापक लसीकरण मोहीम राबवणे बाबत बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या वतीने
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना गुरुवार 08 एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले.
यावेळी बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
चे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, हरिष कुंभरकर, भारत फोर्ज वरिष्ठ एच आर व्यवस्थापक सदाशिव पाटील, पियाजो व्हेकीकल्स चे एच आर व्यवस्थापक किरण चौधरी, चंद्रकांत काळे, जिटीएन सर व्यवस्थापक उद्धव मिश्रा कॉटन किंग चे व्यवस्थापक , चे खंडू गायकवाड, फेरेरो इंडिया चे उमेश दुगाणी श्रायबर डायनॅमिक्स चे मुकेश चव्हाण आदी कंपनी प्रतिनिधी व उद्योजक उपस्तीत होते.
लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी करताना बारामती एमआयडीसी व परिसरातील उद्योगांना स्थानिक प्रशासन पुर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही बारामतीचे प्रांत अधिकारी श्री दादासाहेब कांबळे यांनी या शिष्टमंडळास दिली.