लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी आदराची वागणूक देणारे दादा सतत गावचा विकास आणि सर्व सामांन्याचे प्रश्न सोडविण्यामध्ये मग्न असतात . महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मा जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर ,आदरणीय श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, व फलटण तालुक्याचे सभापती आदरणीय श्रीमंत शिवरुप राजे खर्डेकर या सर्व नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली विश्वासाने जिल्हा परिषद गुणवरे गटामध्ये विविध विकास कामे राबवतात. दादा काम करत असताना निरपेक्ष वृत्तीने काम करत असतात. हा आपला हा विरोधक असा कधीच विचार करत नाहीत. त्यांच्या कडून जर काम होणार असेल तर ते लगेच मार्गी लावतात.
राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांचा जास्त भर असतो. साधी राहणी साधी विचार सरणी आणि साध बोलण यांचा त्रिवेणी संगम म्हणजे विश्वास दादा. मिळालेल्या पदाचा कधीच अहंकार न बाळगलेल्या आणि हे पद सर्व सामांन्याचा विकासासाठी आहे याची सतत ते जाणीव ठेवतात. ते नेहमी सकारात्मक विचार करून शेतकरी, शेतमजूर, कामगार, तरूण यांचे प्रश्न व विधायक कार्यामध्ये नेहमी त्यांचे सहकार्य असते. त्यांचा सहवास, त्यांची निःस्वार्थी वागणूक, त्यांच साध बोलण आणि त्या बोलण्यातून निर्माण झालेली आपुलकी हा कुठलाच प्रामाणिक कार्यकर्ता विसरू शकत नाही. सर्व सामांन्याचा अडीअडचणी मध्ये ते नेहमी खंबीरपणे उभे राहतात .आदरणीय महाराज साहेब व आदरणीय बाबा यांच्या नेतृत्वाखाली गुणवरे गट व गोखळी गावातील विकासकामे करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. अशा निःस्वार्थी, निरहंकारी, निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देओ ही ईश्वर चरणी प्रार्थना .