बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
वाढत्या कोरोना रुग्णांचा फटका बारामती एसटी आगाराला बसला असून दररोज मिळणारे १५ लाखांचे उत्पन्न थेट ४ लाखांवर आले आहे.
आगाराच्या वतीने लांब पल्ल्याच्या बीड, शेगाव, माजलगाव याठिकाणी जाणाऱ्या एसटी गाड्या बंद
करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या घटल्याने
अनेक मार्गावरील एसटी गाड्या कमी करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी
दिली.
गेले वर्षभरापासून राज्याची लालपरी म्हणून ओळख असलेली एसटी कोरोना संख्या वाढल्याने
पुणे-बारामती-पुणे या मार्गावरील
करण्यात आल्या आहेत. या बसच्या दिवसभरात ३५ फेऱ्या होत असत. याउलट याच मार्गावर
बसच्या २० फेऱ्या सुरू असून या बसमध्ये आता वाहक असणार आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी टाळता येणार असून मर्यादित संख्येत प्रवाशांना
प्रवास करता येणार आहे.
अमोल गोंजारी, आगारप्रमुख,
चाके पुन्हा थांबली आहेत. शाळा-महाविद्यालये बंद
असल्याने विद्यार्थी संख्या घटली आहे. याशिवाय लॉकडाउनची भीती असल्याने नागरिक घराबाहेर
फिरणे टाळत आहेत. याचा परिणाम एसटीवर झाला आहे. मागील दोन महिन्यांत उत्पादन वाढविण्यासाठी
पुन्हा अडचणीत आली आहे. डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत सुरळीतपणे सुरू असलेली एसटीची एसटीने विविध पर्यटनस्थळांवर सहलींचे आयोजन
केले होते. याचा फायदा आगाराला झाला. मात्र, पुन्हा कोरोना संख्या वाढल्याने आगाराला फटका
बसू लागला आहे.