बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा):
उत्कृष्ट क्रिकेटपटू व उत्तम प्रशासक म्हणून आय एस एम टी कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून म्हतपूर्ण कामगिरी व सामाजिक भान जपत बारामती परिसरात अनेक उपक्रम आणि उद्योजकांचे मार्गदर्शक म्हणून किशोर भापकर यांचे कार्य आदर्शवादी असल्याचे तालुका
वैदकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी प्रतिपादन केले आहे.
बारामती एमआयडीसी येथील आय एस एम टी कंपनीच्या वतीने कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर भापकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचयात समिती बारामती मध्ये आरोग्य विभागास नागरिकांच्या कोरोना तपासणी साठी अत्यावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी सभापती नीता फरांदे,गटविकास अधिकारी राहुल काळभोर व
आय एस एम टी कंपनीचे अधिकारी अभिजित जगताप, कामगार संघटना अध्यक्ष कल्याण कदम,सचिव गुरुदेव सरोदे,सोसायटी चे चेअरमन सुधीर भापकर,व्हाईस चेअरमन राजेंद्र गवळी व कामगार प्रतिनिधी राकेश आवटे,विशाल शिंदे,विजय खोमणे,संजय जांबले, सुहास शिंदे,संतोष साळवे,बाळासो आटोळे,गोपीचंद नवले,उमाजी भिलारे,हेमंत सोनवणे आणि शंकर पाटील,तानाजी सावंत,संतोष बनकर,
कृष्णांत धोंगडे,महेश कादबाने आदी मान्यवर उपस्तीत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तपासणी साठी रक्तदाब तपासणे तापमान ,ऑक्सिजन मीटर,फेस शिल्ड, मास्क,अप्रोन ,कॅप आदी साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देऊन किशोर भापकर यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने सामाजिक भान व जाण ठेऊन साजरा केला जात आहे याचा आदर्श इतरांनी घेऊन कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनास सर्वतोपरी सहकार्य करावे व कोरोना आटोक्यात आणनेसाठी शासनाच्या सूचनांचे पालन करून लसीकरण करून घ्यावे असेही आव्हान या वेळी गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी केले.
वाढदिवस हे केवळ निमित्त असून सामाजिक वसा घेऊन आय एस एम टी कंपनी नेहमी कार्य करत असते कोरोनाचे सावट दूर व्हावे ही वाढदिवसानिमित्त प्रार्थना करीत असल्याचे सर्व कामगार प्रतिनिधी यांनी सांगितले.
या वेळी आभार प्रदर्शन अभिजित जगताप यांनी केले.