फलटण :
वाचन साखळी समूहातील सर्व सदस्यांसाठी माहे- एप्रिल 2021 मध्ये ‘वाचनसमृद्धी ‘ काव्य स्पर्धेचे आयोजन आदर्श व उपक्रमशील शिक्षिका प्रतिभा लोखंडे मॅडम व प्रतिभा टेमकर मॅडम यांच्याकडून करण्यात आले होते.
वाचन चळवळीस प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे. वाचनामुळे आपणाला चांगले विचार व चांगले संस्कार मिळत असतात. वाचनाचे महत्त्व सर्वांना समजावे या अत्यंत निस्वार्थी भावनेने प्रतिभा लोखंडे मॅडम व प्रतिभा टेमकर मॅडम या स्पर्धेचे आयोजन दर महिन्याला करतात. काव्य स्पर्धेचा विषय प्रत्येक महिन्यातील थोर विचारवंत,लेखक, महापुरुष यांच्या जीवनावर आधारित विषय निवडलेला असतो. माहे एप्रिल – 2021 या महिन्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित काव्य स्पर्धेचा विषय होता.
या काव्यलेखन स्पर्धामध्ये
प्रथम क्रमांक- सी.लक्ष्मण (लक्ष्मण गंगाधर चिमले),
द्वितीय क्रमांक – सिंधुसूत (गणेश भगवान तांबे),तृतीय क्रमांक-
(श्रीमती मोनाली दिनकर आवारे) यांना मिळाला. विजेत्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
वाचन साखळी समूहातील सर्व सदस्यांसाठी माहे एप्रिल 2021 मध्ये ‘वाचनसमृद्धी ‘या स्पर्धेस परीक्षक म्हणून प्रा.मीनल येवले मॅडम यांनी कामकाज पाहिले. या स्पर्धेतील विजेत्यांना पुस्तक भेट सौजन्य आदरणीय श्री.मोहन शिरसाट सर यांचे मिळाले.
विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, पुस्तक, रोख रक्कम भेट
स्वरुपात मिळणार आहे.
वाचन साखळी समूहात सुमारे तीन हजाराहून अधिक सदस्य यामध्ये जोडले गेले आहेत.या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक संपूर्ण राज्यभरातून होत आहे.
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ❗
मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक !!!!!!