बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा):
राज्य सरकारच्या कृषी विभागाने यंदा
‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारासाठी
बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख
राजेंद्र पवार यांची निवड केली आहे. कृषी, कृषी
संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात केलेल्या
उल्लेखनीय कार्याबद्दल शासनाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला. पवार यांनी बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट
ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी
अनेक वर्षे काम केले आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर
पोहचावे, यासाठी ते सातत्याने आग्रही असतात. याची दखल घेत हा
पुरस्कार जाहीर झाला आहे.