बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ):
कोरोना च्या काळात सोशल डिस्टन्स पाळत नागरिकांना व्यायाम करता यावा व नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून भिगवण रस्त्यावरील श्रीराम नगर येथे ओपन जिम लगड उद्योग समूहाच्या वतीने उभारण्यात आली असून त्याची कायमस्वरूपी देखभाल लगड उद्योग समूहाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती बारामती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अविनाश लगड यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
लगड उद्योग समुहाने
श्रीरामनगर येथील चौकात नागरिकांसाठी सुशोभित आसन व्यवस्था दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती व त्याचा योग्य सामाजिक वापर दिसून येत आहे.
मागील वर्षी पासुन करोना आजाराचे संक्रमण सुरू झालेपासुन लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय सामाजिक काम करू शकतो यावर विचार सुरू होता.त्यातुनच लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम करणेची लोकांची सोय केल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो या जाणिवेतून ओपन जीम आमच्या श्रीरामनगर प्रभागात बसविणे ची संकल्पना पुढे आली.
सदर कामी नगराध्यक्षा सौ. पोर्णिमाताई तावरे, उपनगराध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव व जेष्ठ नगरसेवक श्री किरण दादा गुजर,गटनेते सचिन सातव व नगरसेविका सौ नालिमाताई मलगुंडे, यांनी सदर जीम नगरपालिकेच्या ओपन स्पेस मधे बसविणे साठी परवानगी मिळणेकामी सहकार्य केले, त्या बद्दल या सर्वांचे व नगरपालिकेचे मनापासून आभार.
श्रीरामनगर दुध संघ सोसायटीच्या बागेमध्ये ही ओपन जीम बसविणेत आलेली आहे.तरी नागरिकांनी याचा वापर करावा असेही आव्हान अविनाश लगड यांनी केले आहे.
श्रीराम नगर येथील चौक सुशोभीकरण व ओपन जिम साठी केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.