जळोची (फलटण दुडे वृत्तसेवा ) :
मार्च महिन्याचा सरते शेवटी
आर्थिक वर्ष अखेर बँका ना सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्या या मुळे शनिवारी 03 एप्रिल 2021 रोजी बँके मधील दैनदिन व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती परंतु कोरणा होऊ नये म्हणून कोणतेही दक्षता घेतली जात नव्हती असे चित्र शहरातील प्रत्येक बँका मध्ये दिसत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने मास्क वापरावेत सोशल डिस्टन्स ठेवावे हा नियम असताना सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन ची माहिती व पेन्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक व नियमित व्यवहार करणारे बँक ग्राहक यांनी एकाच वेळी बँकेत प्रवेश केल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती बँक प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वेळी फक्त पाच ग्राहकांना बँकेत सोडावे व सोशल डिस्टन्स ठेऊन व्यवहार होऊ पर्यंत बसवावे अशी अपेक्षा पेन्शनधारक निवृत्त महसूल अधिकारी तात्यासाहेब सावंत यांनी सांगितले.
बँक ग्राहक अचानक एकाच वेळी सर्व जण बँकेत येण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रत्येक वेळी 2 ते तीन ग्राहक बँके मध्ये सोडण्याचा प्रयत्न असल्याने तो पर्यंत प्रवेशद्वार मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात असल्याने सर्वांचीच गैरसोय होत आहे ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा ऑनलाइन बँकिंग सुविधा वापरावी बँकेत न येता याचा लाभ घ्यावा असे आव्हान बँक प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
एकूणच काय तर मार्च एन्ड झाल्यावर एप्रिल च्या पहिल्याच शनिवारी सर्वच बँका मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने बँक ग्राहक व बँक प्रशासन यांना कोरोनाचा विसर पडला होता काय ? असा सवाल सर्व सामान्यांना पडला होता