जळोची (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
देशात व राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेऊन बारामती ट्रेकर्स क्लबच्या वतीने आज बारामती ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी बारामती ट्रेकर्स क्लबच्या सदस्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी नागरिकांनी रक्तदान करून गरजूंना रक्ताचा तुटवडा पडू नये याची काळजी घेतली पाहिजे व मोठ्या प्रमाणात केले पाहिजे असे आवाहन अध्यक्ष ॲड सचिन वाघ यांनी केले.यावेळी बारामती ट्रेकर्स क्लब चे सदस्य योगेश वाघ, प्रशांत पवार, ॲड शुभम निंबाळकर, ॲड विष्णू माने,
ॲड अमरसिंह मारकड ,ॲड.प्रशांत राजपुरे, नितीन काटे, प्रदीप ताटे, झाडे, ॲड.अमोल कुदळे, जितेंद्र काटे, पदम निकम ,अमोल तावरे ,भाऊ पवार ,योगेश भारती ,सुनील पवार ,किशोर आटोळे, पोपट सूर्यवंशी,हरीश कुंभारकर ,दादा चौधर, अमोल घोरपडे, सूरज बनकर आदिजान उपस्थित होते.