स्वच्छ भारत अभियानात सुधारणा करून निरोगी देश करावा व बेरोजगारांना नवीन व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात : कु. कांचन खरात

 फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना निवेदन सादर करताना कांचनकन्होजा खरात आणि सहकारी

फलटण :- 

स्वच्छ भारत अभियानात सुधारणा करून किंवा नवीन योजना आखून- स्त्री-पुरुषांसाठी स्वच्छ सुलभ शौचालय गृह/मुतारी बांधण्यासाठी योजना निर्माण करून निरोगी देश करावा तसेच बेरोजगारांना नवीन व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या कु. कांचन खरात यांनी केली

कुमारी खरात पुढे म्हणाल्या की आपल्या राज्यात तसेच देशात खेडी ते देश स्वच्छ ठेवण्यासाठी “स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), तसेच नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियान” इत्यादी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनेतून वैयक्तिक शौचालये, सामूहिक शौचालये व सार्वजनिक शौचालये बांधकामासाठी योजना आहेत. या योजनेतून अनेकांची शौचालये बांधली गेली. त्याबद्दल मा.पंतप्रधान साहेब व अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री साहेबांना भरपूर शुभेच्छा. परंतु या योजनेचा वापर जास्ती करून घरगुती व सामूहिक शौचालयांसाठीच झाल्याचे दिसून येत आहे.ही चांगलीच बाब आहे परंतु सार्वजनिक शौचालय बांधकामाकडे सर्रास सर्वांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी मी या अर्जाद्वारे देशातील सर्व मा.ग्रामसेवक साहेब ते देशाचे मा.मुख्य सचिव साहेब तसेच मा.ग्राम सदस्य ते मा.पंतप्रधान साहेब व राष्ट्रपती साहेबांचे लक्ष वेधत आहे.
१.)आपल्या देशात ५० टक्के महिला व ५० टक्के पुरुष आहेत. तसेच आपला देश हा विकसनशील व विकसित देश असल्यामुळे शहरीकरणात झपाट्याने वाढ होत आहे. कुटिर उद्योग, लघु उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे स्त्री-पुरुषांचे घरातून नोकरीला तसेच विविध कामांसाठी बाहेर जाणे-येणे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातूनच आरोग्याच्या समस्येत ही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. कारण सार्वजनिक शौचालयच नसणे हेच होय. स्त्रीला घरातूनच सर्व कार्य करून बाहेर पडावे लागते. त्यानंतर त्यांना शौचालयास लागले तर तसेच कंट्रोल करून घरी यावे लागते किंवा रस्त्यावर कोठे तरी अडोसा मिळतो का? हे ही पहावे लागते. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर व शरीरावर खूप ज्यादा प्रमाणात होतो. त्याच बरोबर रस्त्याकडेला वाढती घरे, उद्योग यामुळे स्त्री-पुरुषांना मोकळे होणे सोपे राहिले नाही. त्याचा तान व्यक्तीच्या आरोग्या वर होतो. ही दुर्दशा स्त्री-पुरुषांची आहे.
२.)आपल्या राज्यात तसेच देशात ही स्वच्छता अभियान राबवले जात आहे. कोणी व्यक्ती शौचालयास घराबाहेर गेला तर त्या व्यक्तीवर दंड लावला जातो. तसेच त्याला गुलाबाचे फुल देऊन त्यांना लाजवले ही जाते. कारण आपल्या देशातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहावे व पर्यटकांना गावात शिरताना येणारा वास व दिसणारी सुंदर फुले दिसू नयेत म्हणून या योजनेत पर्यटन विभागालाही सामील करून घेतले आहे. परंतु माझ्या मते आपले गाव ते देश खऱ्या अर्थाने स्वच्छ झालाच नाही. कारण राष्ट्रीय रस्ते/महामार्ग, राज्य मार्ग, रस्ते व इतर रस्त्यांना कोठेही शौचालये /मुताऱ्या नाहीत. यामुळे माझ्या अनेक आया, बहिणी व मुलींना (स्त्रियांना) लाज सोडून रस्त्याकडेला नाईलाजाने शौच्यालयास बसावे लागते(जेव्हा कंट्रोल करणे अशक्य होऊन जाते). येणाऱ्या -जानाऱ्या व्यक्ती त्यांच्या त्या नाईलाजपणाचा तमाशा बघत बसतात. शहरात तर त्याहीपेक्षा विचित्र अवस्था या ठिकाणी सुलभ शौचालय नसल्याने तासनतास त्यांना आपल्या शरीराला होणारा त्रास मनमारून सोसत बसावे लागते. पुरुषांचे तर वेगळेच, शौचालयास लागली की कोठेही रस्त्याकडेला थांबतात. तेही रस्त्याला तोंड करून, ये-जा करणारी स्त्री आपल्याला त्या अवस्थे मध्ये बघून लाजेने मान खाली घालते.. तेही ते न पाहता निर्लज्जपणे रस्त्यावर शौचालयास थांबतात. हे आहे का स्वच्छ भारत अभियान ? का पर्यटन विकास? याचा विचार व्हायला पाहिजे.
उपाय :-
१.) शहरी भागात ठिकठिकाणी सुलभ शौचालय बांधावीत. त्याच बरोबर त्याच्या बाजूला एक १०*१० फुटाच्या शॉपी साठी एक गाळा काढावा. जेणेकरून कोणी हे सुलभ शौचालय स्वच्छतेसाठी घेईल त्याच्या उदरनिर्वाहाचे ते साधन होईल. त्यामुळे या सुलभ शौचालयाची स्वच्छता पण होत राहील. आणि त्या ठिकाणी जे कोणी येईल त्यांचे संरक्षण ही होईल आणि जो कोणी ते सुलभ शौचालय चालवायला घेईल त्याचे त्या शेजारील शॉपीमुळे मजुरीचा प्रश्‍न ही मिटेल.
२.) त्याचबरोबर हे सुलभ शौचालय, शॉपी व आजूबाजूचा परिसर सीसीटीव्ही कक्षेत यावा,जेणेकरून महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड कंट्रोल मध्ये येईल. या सीसीटीव्हीचे कंट्रोल पोलीस यंत्रणेकडे असेल तर होणाऱ्या चोऱ्या, लूटमार, छेडछाडी,… सर्वच आटोक्यात येऊन याचा उपयोग गुन्हेगारी तपासात होईल.
३.)राष्ट्रीय मार्ग, राज्यमार्ग व इतर रस्ते या सर्व रस्त्यांवर रस्तेंच्या दोन्ही बाजूला म्हणजे एका बाजूला चार किलोमीटर अंतरावर सुलभ शौचालय व शॉपी उभारावे. त्यानंतर त्या सुलभ शौचालयापासून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला चार किलोमीटर अंतरावर तसेच सुलभ शौचालय व शॉपी उभारावी. जेणेकरून आठ किलोमीटर अंतरावर सुलभ शौचालय व शॉपी ची व्यवस्था निर्माण होईल. तेही व्यक्तींच्या संरक्षणात.
४.)या प्रत्येक सुलभ शौचालयाच्या शॉपी वर स्त्रियांसाठी सॅनिटरी पॅडची सोय सक्तीची करावी. जेणेकरून महिलांना पाळीचा/ पिरेड चा होणारा त्रास आटोक्यात येईल.
५.) ग्रामसेवक साहेब, मुख्य अधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, तसेच जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती आहे की, आपापल्या स्तरावर या पद्धतीच्या सुलभ शौचालयांच्या बांधकामाची मोहीम आपल्या हाती घ्यावी व आपल्या हातातील गाव, तालुका, जिल्ह्यांमध्ये स्त्रियांची व पुरुषांची होणारी गैरसोय टाळता येईल.
६.)स्वच्छ भारत अभियानांतर्गत दिले जाणारे पुरस्कार, हे ज्या गावांना जाहीर झालेत किंवा भविष्यात जाहीर होतील त्या गावात या पद्धतीचे सुलभ शौचालय असायलाच पाहिजेत असे या अभियानात नोंद करण्यात यावी. ही विनंती.
७.)नुसते उघड्यावर शौचालयास गेली की, दंड करण्यापेक्षा पहिल्यांदा त्या पद्धतीच्या सुयोग्य सोयी उपलब्ध कराव्यात. मंग त्यावरील कड्क कायदे तयार करावेत ही विनंती.
वरील उपायांसाठी स्वच्छ भारत अभियानात सुधारणा कराव्यात किंवा नवीन योजना आखून अस्तित्वात आणावी. जेणेकरून स्त्री-पुरुषांचे आरोग्य सुधारेल व त्यांचे जीवाचे संरक्षण होईल त्याचबरोबर सध्या वाढत चाललेली बेरोजगारी, त्यातील काही बेरोजगारांना सुलभ शौचालया बरोबर तयार होणाऱ्या शॉपिंचा नक्कीच उदरनिर्वाहासाठी उपयोग ही होईल. त्याच बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसायला ही मदत होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून तात्काळ स्वच्छ भारत अभियानात सुधारणा कराव्यात किंवा नवीन योजना अस्तित्वात आणाव्यात, त्यासाठी शासनाने रस्त्याकडील लागणाऱ्या जागा ताब्यात घ्याव्यात. आणि या योजनेला सुरुवात करावी. ही विनंती.
तसेच फलटणच्या मुख्याधिकार्‍यांना नम्र विनंती की,आपल्या फलटण मधील सुलभ शौचालयाचा ही प्रश्न हाती घेऊन फलटणच्या वैभवात भर घालावी ही नम्र विनंती.या निवेदनाच्या प्रती मा.फलटण :- स्वच्छ भारत अभियानात सुधारणा करून किंवा नवीन योजना आखून- स्त्री-पुरुषांसाठी स्वच्छ सुलभ शौचालय गृह/मुतारी बांधण्यासाठी योजना निर्माण करून निरोगी देश करावा तसेच बेरोजगारांना नवीन व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या खरात कांचनकन्होजा यांनी केली

  कांचनकन्होजा खरात पुढे म्हणाल्या की  आपल्या राज्यात तसेच देशात खेडी ते देश स्वच्छ ठेवण्यासाठी “स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), तसेच नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियान” इत्यादी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनेतून वैयक्तिक शौचालये, सामूहिक शौचालये व सार्वजनिक शौचालये बांधकामासाठी योजना आहेत. या योजनेतून अनेकांची शौचालये बांधली गेली. त्याबद्दल मा.पंतप्रधान साहेब व अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री साहेबांना भरपूर शुभेच्छा. परंतु या योजनेचा वापर जास्ती करून घरगुती व सामूहिक शौचालयांसाठीच झाल्याचे दिसून येत आहे.ही चांगलीच बाब आहे परंतु सार्वजनिक शौचालय बांधकामाकडे सर्रास सर्वांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी मी या अर्जाद्वारे देशातील सर्व मा.ग्रामसेवक साहेब ते देशाचे मा.मुख्य सचिव साहेब तसेच मा.ग्राम सदस्य ते मा.पंतप्रधान साहेब व राष्ट्रपती साहेबांचे लक्ष वेधत आहे.
१.)आपल्या देशात ५० टक्के महिला व ५० टक्के पुरुष आहेत. तसेच आपला देश हा विकसनशील व विकसित देश असल्यामुळे शहरीकरणात झपाट्याने वाढ होत आहे. कुटिर उद्योग, लघु उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे स्त्री-पुरुषांचे घरातून नोकरीला तसेच विविध कामांसाठी बाहेर जाणे-येणे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातूनच आरोग्याच्या समस्येत ही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. कारण सार्वजनिक शौचालयच नसणे हेच होय. स्त्रीला घरातूनच सर्व कार्य करून बाहेर पडावे लागते. त्यानंतर त्यांना शौचालयास लागले तर तसेच कंट्रोल करून घरी यावे लागते किंवा रस्त्यावर कोठे तरी अडोसा मिळतो का? हे ही पहावे लागते. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर व शरीरावर  खूप ज्यादा प्रमाणात होतो. त्याच बरोबर रस्त्याकडेला वाढती घरे, उद्योग यामुळे स्त्री-पुरुषांना मोकळे होणे सोपे राहिले नाही. त्याचा तान व्यक्तीच्या आरोग्या वर होतो. ही  दुर्दशा स्त्री-पुरुषांची आहे. 
२.)आपल्या राज्यात तसेच देशात ही स्वच्छता अभियान राबवले जात आहे. कोणी व्यक्ती शौचालयास घराबाहेर गेला तर त्या व्यक्तीवर दंड लावला जातो. तसेच त्याला गुलाबाचे फुल देऊन त्यांना लाजवले ही जाते. कारण आपल्या देशातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहावे व पर्यटकांना गावात शिरताना येणारा वास व दिसणारी सुंदर फुले दिसू नयेत म्हणून या योजनेत पर्यटन विभागालाही सामील करून घेतले आहे. परंतु माझ्या मते आपले गाव ते देश खऱ्या अर्थाने स्वच्छ झालाच नाही. कारण राष्ट्रीय रस्ते/महामार्ग, राज्य मार्ग, रस्ते व इतर रस्त्यांना कोठेही शौचालये /मुताऱ्या नाहीत. यामुळे माझ्या अनेक आया, बहिणी व मुलींना (स्त्रियांना) लाज सोडून रस्त्याकडेला नाईलाजाने शौच्यालयास बसावे लागते(जेव्हा कंट्रोल करणे अशक्य होऊन जाते). येणाऱ्या -जानाऱ्या व्यक्ती त्यांच्या त्या नाईलाजपणाचा तमाशा बघत बसतात. शहरात तर त्याहीपेक्षा विचित्र अवस्था या ठिकाणी सुलभ शौचालय नसल्याने तासनतास त्यांना आपल्या शरीराला होणारा त्रास मनमारून सोसत बसावे लागते. पुरुषांचे तर वेगळेच, शौचालयास लागली की कोठेही रस्त्याकडेला थांबतात. तेही रस्त्याला तोंड करून, ये-जा करणारी स्त्री आपल्याला त्या अवस्थे मध्ये बघून लाजेने मान खाली घालते.. तेही ते न पाहता निर्लज्जपणे रस्त्यावर शौचालयास थांबतात. हे आहे का स्वच्छ भारत अभियान ? का पर्यटन विकास? याचा विचार व्हायला पाहिजे.
उपाय :- 
१.) शहरी भागात ठिकठिकाणी सुलभ शौचालय बांधावीत. त्याच बरोबर त्याच्या बाजूला एक १०*१० फुटाच्या शॉपी साठी एक गाळा काढावा. जेणेकरून कोणी हे सुलभ शौचालय स्वच्छतेसाठी घेईल त्याच्या उदरनिर्वाहाचे ते साधन होईल. त्यामुळे या सुलभ शौचालयाची स्वच्छता पण होत राहील. आणि त्या ठिकाणी जे कोणी येईल त्यांचे संरक्षण ही होईल आणि जो कोणी ते सुलभ शौचालय चालवायला घेईल त्याचे त्या शेजारील शॉपीमुळे मजुरीचा प्रश्‍न ही मिटेल.
२.) त्याचबरोबर हे सुलभ शौचालय, शॉपी व आजूबाजूचा परिसर सीसीटीव्ही कक्षेत यावा,जेणेकरून महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड कंट्रोल मध्ये येईल. या सीसीटीव्हीचे कंट्रोल पोलीस यंत्रणेकडे असेल तर होणाऱ्या चोऱ्या, लूटमार, छेडछाडी,… सर्वच आटोक्यात येऊन याचा उपयोग गुन्हेगारी तपासात होईल.
३.)राष्ट्रीय मार्ग, राज्यमार्ग व इतर रस्ते या सर्व रस्त्यांवर रस्तेंच्या दोन्ही बाजूला म्हणजे एका बाजूला चार किलोमीटर अंतरावर सुलभ शौचालय व शॉपी उभारावे. त्यानंतर त्या सुलभ शौचालयापासून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला चार किलोमीटर अंतरावर तसेच सुलभ शौचालय व शॉपी उभारावी. जेणेकरून आठ किलोमीटर अंतरावर सुलभ शौचालय व शॉपी ची व्यवस्था निर्माण होईल. तेही व्यक्तींच्या संरक्षणात.
४.)या प्रत्येक सुलभ शौचालयाच्या शॉपी वर स्त्रियांसाठी सॅनिटरी पॅडची सोय सक्तीची करावी. जेणेकरून महिलांना पाळीचा/ पिरेड चा होणारा त्रास आटोक्यात येईल.
५.) ग्रामसेवक साहेब, मुख्य अधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, तसेच जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती आहे की, आपापल्या स्तरावर या पद्धतीच्या सुलभ शौचालयांच्या बांधकामाची मोहीम आपल्या हाती घ्यावी व आपल्या हातातील गाव, तालुका, जिल्ह्यांमध्ये स्त्रियांची व पुरुषांची होणारी गैरसोय टाळता येईल.
६.)स्वच्छ भारत अभियानांतर्गत दिले जाणारे पुरस्कार, हे ज्या गावांना जाहीर झालेत किंवा भविष्यात जाहीर होतील त्या गावात या पद्धतीचे सुलभ शौचालय असायलाच पाहिजेत असे या अभियानात नोंद करण्यात यावी. ही विनंती.
७.)नुसते उघड्यावर शौचालयास गेली की, दंड करण्यापेक्षा पहिल्यांदा त्या पद्धतीच्या सुयोग्य सोयी उपलब्ध कराव्यात. मंग त्यावरील कड्क कायदे तयार करावेत ही विनंती.
    वरील उपायांसाठी स्वच्छ भारत अभियानात सुधारणा कराव्यात किंवा नवीन योजना आखून अस्तित्वात आणावी. जेणेकरून स्त्री-पुरुषांचे आरोग्य सुधारेल व त्यांचे जीवाचे संरक्षण होईल त्याचबरोबर सध्या वाढत चाललेली बेरोजगारी, त्यातील काही बेरोजगारांना सुलभ शौचालया बरोबर तयार होणाऱ्या शॉपिंचा नक्कीच उदरनिर्वाहासाठी उपयोग ही होईल. त्याच बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसायला ही मदत होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून तात्काळ स्वच्छ भारत अभियानात सुधारणा कराव्यात किंवा नवीन योजना अस्तित्वात आणाव्यात, त्यासाठी शासनाने रस्त्याकडील लागणाऱ्या जागा ताब्यात घ्याव्यात. आणि या योजनेला सुरुवात करावी. ही विनंती. 
तसेच फलटणच्या मुख्याधिकार्‍यांना नम्र विनंती की,आपल्या फलटण मधील सुलभ शौचालयाचा ही प्रश्न हाती घेऊन फलटणच्या वैभवात भर घालावी ही नम्र विनंती.या निवेदनाच्या प्रती मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सडक परिवहन मंत्री मा.नितीन गडकरी, केंद्रीय पर्यावरण मंत्री मा.प्रकाश जावडेकर, केंद्रीय ग्रामविकास मंत्री मा.नरेद्र सिंह तोमर, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मा.स्मृती इराणी, मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे, राज्य नगरविकासमंत्री मा.एकनाथ शिंदे,राज्य पर्यटन मंत्री मा.आदित्य ठाकरे,राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे यांना माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत असे कु.खरात यांनी सांगितले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!