गोखळी (प्रतिनिधी ) :
फुले शाहु आबेडकर एज्युकेशनल अँड सोशहल फौंडेशन तर्फे एकपात्री कलाकार मी सावित्री, मी अहिल्याबाई,मी रमाई असे अनेक महापुरुषांचे जीवनपट उलगडणारे व व्याख्यानाचे माध्यमातून गावपातळीवर ते परदेशात प्रबोधन करणाऱ्या प्रा.शुभांगी शिंदे यांचा अध्यक्ष रघुनाथ ढोक , बाळूमामा, फुलला सुगधं मातीचा,नांदा सौख्य भरे असे विविध मालिकेत व लघुपटात काम करणारी व कल्याणी बहुउद्देशीय संस्थेच्या सिनेअभिनेत्री सिद्धी कामथ, उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या नम्रता गुरव आणि शिदोरी व 777 रुपयात बाबा या लघुपटात काम करणारे अभिनेते व लेखक ,दिग्दर्शक महेश्वर तेटं।बे यांचा सामाजिक प्रबोधनाबद्दल थोरसमाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा फोटो फ्रेम, ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ग्रंथ व शाल श्रीपळ देऊन सावित्रीबाई फुले यांच्या 124 व्या स्मृतिदिनानिमित्ताने दि.21 मार्च 2021 रोजी रात्री सन्मानित करण्यात आले. यावेळी सिद्धी कामथ व शुभांगी शिंदे म्हणाले की सावित्रीबाई नी त्या काळात केलेले कार्याची तुलना आज कशातच होऊ शकत नसून आजच्या महिला सर्वत्र आघाडीवर आहेत ही पुण्याई त्याचे मुळेच हे विसरून देखील चालणार नाही.आजच्या महिला मुली सुरक्षित रहाणे करीता ढोक यांच्या सामाजिक संस्थेसारखे सत्कार उपयोगी पडतात त्यामुळे सामाजिक सलोखा निर्माण होते असे कलाकार महेश्वर म्हणाले तर सर्वांनी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे मनापासून सामाजिक कार्य करीत सत्यशोधक विवाह लावून अंधश्रद्धा कर्मकांड पासून समाजाचे प्रबोधन करीत शहरात व ग्रामीण भागात कार्य करीत असले बद्दल अभिनंदन केले तर आभार पत्रकार राहुल खरात यांनी मानले.