फलटण :
संगिनी फोरम ने फलटण परीसरात असंख्य सामाजीक कामे करुन आपले वेगळेपण दाखवुन दीले असुन,संगिनी फोरम सामाजीक क्षेत्रातील एक अग्रगण्य संघटना असल्याचे प्रतिपादन वैशाली शिंदे यांनी केले. त्या संगिनी फोरम आयोजित विविध क्षेत्रातील महिलांचा महिला दिना निमीत्त आयोजित सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थाना वरुन बोलत होत्या.
कार्यक्रमासाठी पोलादपुर येथील मनिषा भुतकर,व बारामतीहुन स्मिता शहा प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या ग्रुपच्या अध्यक्षा निना कोठारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक करुन उपस्थितांना संगिनीच्या कार्याची माहीती दिली
यावेळी भारतीय कनिष्ट महिला हाॅकी संघामधे निवड झाल्या बद्दल कु.रुतुजा पिसाळ,कु.वैष्णवी फाळके,कु.अक्षता ढेकळे याचां सत्कार करण्यात आला.इंडसइंड बॅकेच्या मॅनेजर प्रिती अतुल शहा यांचा सलग तिसर्यांदा सेवा पुरस्कार मिळाल्या बद्दल सन्मान करण्यात आला.त्यागी सेवेबद्दल सुजाता शहा,अलका शहा याचां सन्मान करण्यात आला.
सायकाॅलाॅजिस्ट झाल्याबद्दल स्मिता शहा,तर समाजातील पुराणवादी प्रथानां फाटा देऊन विधवा स्ञियांसाठी कार्यक्रम घेतल्या बद्दल श्रीमती मनिषा भुतकर,पोलादपुर तसेच भारत सरकार तर्फे रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे सल्लागार समितीवर निवड झाल्या बद्दल आयडियल किड्सच्या संस्थापिका वैशाली शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.या सन्मान सोहळ्या साठी संगिता दोशी, विनयश्री दोशी,पोर्णीमा शहा,सारिका सचिन दोशी,सारिका पुनम दोशी,अलका पाटील,जयश्री उपाध्ये,वृषाली गांधी,प्रणाली गांधी,ऋतुजा कल्लनवार ,निता दोशी,दिपीका व्होरा ,सपना शहा,ज्योती शहा व प्रतिभा शहा संगिनी सदस्या उपस्थीत होत्या.कार्यक्रमाचे सुत्र संचालन दिप्ती राजवैद्य यांनी केले.आभार प्रदर्शन अपर्णा जैन यांनी केले.कार्यक्रमानंतर सर्वासाठी आल्पोपहार देण्यात आला.