बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :
गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे उदयॊगक्षेत्रात आलेली मंदी यामुळे विद्यार्थ्यांसाठी नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीयेत.अशा आव्हानात्मक वातावरणात सुद्धा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात महाविद्यालयातर्फे विविध कंपन्यांचे ऑनलाइन ऑनकॅम्पस व ऑफकॅम्पस ड्राईव्हसचे आयोजन करण्यात आले होते त्यामधून १०५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या प्रमुख कंपन्या पुढील प्रमाणे टीसीएस, बायजूस, इन्फोसिस, पर्सिस्टन्ट सिस्टिम्स, यार्डी सॉफ्टवेअर, एंझीग्मा सॉफ्टवेअर, रिलायन्स जिओ, माईंडट्री, एक्सेंचर, कॅनान, अँमडॉक्स, पियाजिओ वेहिकल्स, कल्याणी टेक्नोफोर्ज, सामा टेक्नॉलॉजीज.
नुकत्याच झालेल्या गेट २०२१ या आयआयटीतर्फे देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. महाविद्यालयाचे १५ विद्यार्थ्यांनी हि परीक्षा यशस्वीरित्या पास झाले आहेत त्यापैकी अनुज फुलारी (कॉम्पुटर इंजिनीअरिंग) याचा ऑल इंडिया रँक १६४ आणि चेतन बनकर (इंजिनीअरिंग सायन्स) याचा ऑल इंडिया रँक १२४० आला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे गेट एक्झाम कोऑर्डिनेटर श्रीनिवास शेळगे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे व येणाऱ्या काळात अजून नवनवीन कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्हसचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल कोरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी व समाजातील इतर नागरिकांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.
महाविद्यालयात सतत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवत जातात, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अहोरात्र झटत असतात अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर एस बिचकर यांनी दिली.