सातारा :
विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत आठवडी बाजार अंतर्गत तालुक्यातील सर्व महिला शेतकरी गट, पुरुष शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना महाराष्ट्र शासन कृषि यांच्या मार्फत शेतात पिकणाऱ्या भाजीपाला, फळे,फुले,कडधान्ये, गळीतधान्य, तृणधान्य, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले व इत्यादी शेतमालास थेट विक्रीसाठी महिला शेतकरी गट, पुरुष शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना लोखंडी स्टँड-1, इलेक्टरी वजन काटा- 1, प्लास्टिक क्रेटस-5 व छत्री- 1 या बाबींचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्या साठी महिला शेतकरी गट, पुरुष शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी 7080/-(सात हजार ऐंशी रुपये) आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, आत्मा BTM यांच्या कडे जमा करावेत. वरील बाबींसाठी अनुदान रक्कम रुपये 3000/-(तीन हजार रुपये) शेतकरी गट याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
सोबत जमा करायची कागदपत्रे –
1) विकेल ते पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत आठवडी बाजार या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक कंपनी यांचा अर्ज
2) शेतकरी गटातील सर्व सभासद यांचा ठराव वरील सर्व प्रकारच्या वस्तू किंवा बाबी ह्या शेतकरी गट/ शेतकरी कंपनी च्या अध्यक्ष याना किंवा गटातील कोणत्याही सभासद यांना द्याव्यात त्या बाबत आमची कोणतीही तक्रार नाही.
3) शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या नावाचे बँक खाते पासबुक झेरॉक्स ही कागदपत्रे