शहीद परिवाराचा सन्मान करताना मान्यवर
बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ):
२३ मार्च शहीद दिवसानिमित्ताने जयहिंद फाऊंडेशन, बारामती आयोजित “हुतात्मा परिवारांचा सन्मान सोहळा” बुधवार 24 मार्च 2021 रोजी नव महाराष्ट्र विद्यालय, पणदरे, बारामती येथे पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रजनीकांत गायकवाड व डॉ. संतोष धायगुडे ,बारामती तालुका आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष. हनुमंत निंबाळकर , तसेच त्रिदल सैनिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष संदीपजी लगड उपस्थित होते.
सदर कार्यक्रम मध्ये शहीद जवान राजाराम मारुती बनकर, मेजर लालासो भीमराव नाळे, सुभेदार विजय महादेव राजपुरे, मेजर संजय शिवाजी धायगुडे, मेजर राजेंद्र सोमनाथ जगदाळे व सुभेदार पिंटू राजाराम सुळ या परिवारातील वीरपत्नी व त्यांच्या मुलांचा सन्मानचिन्ह, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
शहीद परिवाराला जी काही वैद्यकीय मदत लागेल ती देण्याचे आश्वासन डॉ विक्रम जगताप, डॉ संतोष धायगुडे, डॉ कोकरे, डॉ रजनीकांत गायकवाड यांनी दिले.
सुत्रसंचालन प्रा. श्री.प्रकाश कुंभार यांनी केले