बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ):
सोमवार दि.08/03/2021 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्ञानसागर गुरुकुल, सावळ या शाळेतर्फे महिला पालकांसाठी *आई म्हणून मी स्वतः चे लाड कसे पुरवते* या विषयावर ऑनलाईन स्पर्धा दि. 4/03/2021 ते दि. 7/03/2021 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उत्कृष्ट पद्धतीचे व्हिडीओ पाठविले. सदर स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण सोमवार दि. 8/03/2021 रोजी ज्ञानसागर गुरुकुल सावळ या ठिकाणी करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ. स्वाती महेश घोळवे, द्वितीय क्रमांक सौ. मोरे संध्या अमित यांनी पटकाविला. विजेत्या महिलांना ज्ञानसागर गुरुकुलची मानाची पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा करंडा आणि मुकुट या स्वरूपात पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच महिला शिक्षिकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये सौ. छाया शिंदे यांनी सुद्धा ज्ञानसागर गुरुकुलची मानाची पैठणी मिळविण्याचा मान प्राप्त केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष-श्री.सागर आटोळे, उपाध्यक्षा-सौ.रेश्मा गावडे, कार्याध्यक्षा-सौ.प्रियांका आटोळे, सचिव-मानसिंग आटोळे, सहसचिव-सौ. अलका आटोळे, संचालिका-पल्लवी सांगळे, सीईओ-संपत जायपत्रे सर, विभाग प्रमुख-गोरख वणवे सर, प्रमुख पाहुणे सौ. ज्योती दिपक आवाळे-सरपंच सावळ, सौ.सीमा भालेराव झारगड-सरपंच खताळपट्टा, सौ.ललिता किरण आवाळे-आरोग्यसेविका सावळ, सौ.सुनीता दत्तात्रय आवाळे-सदस्य सावळ, सौ.वंदना मनिष पंडित-महिला शासकीय आरोग्यसेविका व सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.