फलटण प्रतिनिधी :- फलटण शहरातील ऐतिहासिक ‘छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय’ संचालकपदी तुषार जगदेवराव नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली असून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
फलटण संस्थानाचे अधिपती श्रीमंत मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी लोकहिताच्या दूरदृष्टीने या वाचनालयाची स्थापना २ ऑगस्ट १८७० रोजी स्थापना केली ब्रिटिशकालीन वैभव असणारी १५० वर्षांपूर्वीची ही इमारत सगळ्या फलटणवासीयांसाठी अभिमानाचा विषय असून. भव्य आणि प्रशस्त अशा या वास्तूत लाकडाचे आखीव-रेखीव दुर्मीळ काम आहे. या दोन मजली वाचनालयाच्या इमारतीची वास्तुरचना आकर्षक असून, तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून या वास्तूकडे पाहिले जाते.
या ऐतिहासिक ‘छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय’ संचालकपदी तुषार जगदेवराव नाईक निंबाळकर यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषद अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निबाळकर, आमदार दीपक चव्हाण,कृषि उत्पन्न बाजार समीती चे अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर आदिंनी अभिनंदन केले.