बारामती ( फलटण टुडे ) :
बारामती नगरपरिषद च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोरोना सर्वेक्षण साठी बारामती शहर मधी देसाई इस्टेट मध्ये रुई नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला
रविवार दि.21 मार्च रोजी नगरपरिषद मधील अधिकारी व कर्मचारी आणि नगरपरिषद शाळा मधील शिक्षक यांच्या साह्याने प्रत्येक घरोघरी जाऊन कोरोना विषयी प्रत्येक कुटूंबाची माहिती घेणे,ऑक्सिजन व तापमान पातळी तपासणे आदी माहिती घेऊन जर कोरोना विषयक लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टर किंवा शासकीय रुग्णालयात नेहण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती.
या वेळी मास्क वापरा,सॅनिटायझर चा वापर करा व आवश्यकता असल्या शिवाय घराच्या बाहेर जाऊ नका ज्येष्ठ नागरिक किंवा वय वर्ष 45 च्या पुढे असल्यास कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सुचवण्यात आले या विषयी जनजागृती करण्यात आली.कोरोनाची लक्षणे काय आहेत या विषयी माहिती देण्यात आली
या प्रसंगी नगरसेवक अतुल बालगुडे,शहर राष्ट्रवादी युवक चे उपाध्यक्ष संग्राम खंडागळे, हेमंत नवसारे,राहुल वायसे, दीपक गायकवाड,शिवलिंग गजाकस,वैभव नींबाळकर, नगरपरिषद चे अधिकारी झेंडे साहेब आदी मान्यवर उपस्तीत होते.