फलटण ( फलटण टुडे ) :
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर यांच्या वतीने धुळदेव गावचे सुपुत्र *मा.श्री.मनोज जाधव साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.)जि.प.सातारा यांना महाराष्ट्र शासनाचा “गुणवंत अधिकारी” हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा “रेशमीबंध” नावाचा कवितासंग्रह तसेच “मानपत्र” देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.यावेळी श्री.मनोज जाधव साहेब हे अतिशय शांत ,संयमी,अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.गेले दोन वर्ष सातारा जिल्हा परिषद मध्ये त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाने त्यांना “गुणवंत अधिकारी” हा पुरस्कार जाहीर केला आहे.आत्तापर्यंत श्री.मनोज जाधव साहेब यांनी ज्या ज्या ठिकाणी कार्य केले त्या ठिकाणातील अनेक कर्मचारी, अधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेले. भावी आयुष्यात ही त्यांची उत्तरोत्तर अशीच त्यांची प्रगती होवो,अशी सदिच्छा आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरचे संस्थापक अध्यक्ष श्री.गणेश तांबे सर यांनी व्यक्त केली.यावेळेस आई प्रतिष्ठानचे विश्वस्त दत्तात्रय शिंगटे सर, सुनील मदने सर,प्रशांत देशपांडे सर,नवनाथ काशीद सर ,नितीन फरांदे सर,सौ सुनीता बनकर मॅडम तसेच आहे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आनंदगिरी गोसावी सर, धन्यकुमार तारळकर सर, रवींद्र परमाळे सर, प्रशांत जाधव सर इ.या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. कोरोना सदृश्य परिस्थिती लक्षात घेता प्रातिनिधिक स्वरूपात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.सदर मानपत्राचे लेखन आदर्श शिक्षिका व कवयित्री सौ.अंजली गोडसे मॅडम यांनी केले, तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदर्श शिक्षक श्री.नितीन फरांदे सर यांनी केले. तसेच आदरणीय श्री.मनोज जाधव साहेब यांनी आई प्रतिष्ठानच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम संपन्न झाला.