कबड्डी मॅट चे पूजन करताना प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व दादा आव्हाड आणि कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी (छाया डी फोकस स्टुडिओ मुंबई)
बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ):
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने व पुणे जिल्हा असोसिएशन च्या सहकार्याने 68 वि पुरुष वरिष्ठ गट मैदानी कबड्डी राज्य निवड चाचणी 2021 चा शुभारंभ बारामती मध्ये प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या शुभहस्ते बुधवार दि 17 मार्च रोजी करण्यात आला.
या प्रसंगी तहसीलदार विजय पाटील,नगरपरिषद चे गटनेते सचिन सातव,नगरसेवक अतुल बालगुडे,क्रीडा संकुल समिती सदस्य अविनाश लगड,हेमंत नवसारे व
राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यालइन प्रमुख सचिन भोसले ,खजिनदार मंगल पांडे,निवड समिती सदस्य संजय मोकाल,रामचंद्र जाधव,जे जे पाटील,यशवंत यादव,राजेश पाडावे, बजरंग परदेशी,मदन गायकवाड,सौ शिल्पा भोसले,प्रशांत सुर्वे,अनिल यादव,प्रकाश बालवडकर,प्रथमेश पाटील,केतन गायकवाड आदी मान्यवर उपस्तीत होते.सदर निवड चाचणी स्पर्धे चे आयोजन बारामती स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष प्रो कबड्डी खेळाडू दादासाहेब आव्हाड,सचिव अजिनाथ खाडे, राजेंद्र गोफने,मोहन कचरे,दत्ता चव्हाण आदींनी केले आहे.
खेळाडूंनी यश मिळवताना खिलाडू वृत्ती दाखवावी व देशात व परदेशात मोठी पदके मिळवून आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.
राज्य व देश पातळीवरील कबड्डी खेळाडू साठी शासनाने मोठ्या प्रमाणात सवलती व 5 टक्के नौकरी साठी साह्य केले आहे त्याचा खेळाडूंनी सातत्याने सराव व यश मिळवत फायदा घ्यावा असे मत मंगल पांडे यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल सावळेपाटील यांनी केले.